किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : यजमान वेस्ट इंडिज संघाने कसोटी मालिकेत कमबॅक करण्यासाठी कंबर कसली आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटीत विंडीजचे वस्त्रहरण केले. टीम इंडियाने पहिला सामना 318 धावांनी जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यासाठी विंडीजचा प्रमुख खेळाडू किमो पॉल तंदुरुस्त झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे पहिल्या कसोटीत मिग्युएल कमिन्सला संधी मिळाली होती. पॉल तंदुरुस्त झाल्यामुळे कमिन्सला संघाबाहेर जावे लागले आहे. भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून किंगस्टन येथे सुरू होणार आहे. कमिन्सला पहिल्या कसोटीत एकही विकेट घेतला आली नाही. ट्वेंटी-20 मालिकेत पॉलने शिखर धवन, मनिष पांडे आणि कृणाल पांड्या या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले होते.
दरम्यान, विंडीजच्या शेन डॉवरीचने दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून माघारी घेतली आहे.
असा आहे संघ - जेसन होल्डर, क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शॅमर्ह ब्रुक्स, जॉन कॅम्प्बेल, रोस्टन चेस, रॅहकिम कोर्नवॉल, जॅहमर हॅमिल्टन, शेनॉन गॅब्रिएल, शिमरॉन हेटमायर, शे होप, किमो पॉल, केमार रोच.
न्यूझीलंडनं विराट कोहलीचं टेंशन वाढवलं; असं काय आहे कारण?
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) कसोटी क्रिकेटला जीवंत ठेवण्यासाठी जागतिक कसोट अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली. 1 ऑगस्टपासून सुरू झालेली ही स्पर्धा पुढील दोन वर्ष चालणार आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक कसोटी मालिका या स्पर्धेंतर्गत येणार आहेत. अॅशेस कसोटी मालिकेने या स्पर्धेचा श्रीगणेशा केला आणि ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत पहिल्या विजयाचा मान पटकावला. आतापर्यंत विजयी संघाच्या पंक्तित इंग्लंड, श्रीलंका, भारत आणि न्यूझीलंड यांनी स्थान पटकावले आहे. पण, रविवारी न्यूझीलंडने मिळवलेला विजय हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचं टेंशन वाढवणारा ठरला आहे.
भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेची दमदार खेळी यांना या विजयाचे श्रेय जाते. हा विजय मिळवून भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 60 गुणांची कमाई केली आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. सध्याची गुणतालिका पाहता भारतासह श्रीलंका आणि न्यूझीलंड हेही प्रत्येकी 60 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या व दुसऱ्या स्थानी आहेत.
न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एक डाव व 65 धावांनी विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. या कामगिरीसह किवींनी खात्यात 60 गुण जमा केले. त्यामुळे आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, श्रीलंका व न्यूझीलंड यांच्या खात्यात प्रत्येकी 60 गुण झाले आहेत. पण, केवळ एका सामन्यात भारताने 60 गुण कमावल्यानं ते अव्वल स्थानी आहेत. पण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सामन्यात भारताला विजय मिळवून अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याची संधी आहे. या सामन्यात विंडीजने विजय मिळवल्यास भारत अव्वल स्थान गमावू शकतो. कारण, न्यूझीलंडने डावाने कसोटी सामना जिंकला आहे आणि टीम इंडिया पराभूत झाल्यास ते अव्वल स्थानी विराजमान होऊ शकतात.
Web Title: India vs West Indies, 2nd Test : Keemo Paul replaces Miguel Cummins for the 2nd Test v India in Jamaica
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.