वेस्ट इंडिज आणि भारतामध्ये सुरु असणारी दुसरी कसोटी रंगतदार वळणावर आली आहे. आज पाचव्या दिवशीचा खेळ सुरु होणार आहे. भारतीय संघासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. कारण विंडीजसमोर 365 रन्सचे लक्ष्य ठेवले आहे. वेस्ट इंडिजने चौथ्या दिवशी दोन विकेट गमावत 76 रन्स केले आहेत. यामुळे भारतासाठी विंडीजचे विकेट आणि इंडीजला रन्स महत्वाचे असणार आहेत.
वेस्ट इंडिजला अद्याप विजयासाठी 289 रन्स हवे आहेत. तर ८ विकेट हातात आहेत. तेजनारायण चंद्रपॉल 24 आणि ब्लॅकवुड हा 20 रन्स बनवून खेळत आहेत. भारतीय संघासाठी हा सामना सोपा वाटत असला तरी मेहनतीवर पाणी फेरण्याची शक्यता आहे. कारण पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार सोमवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुपारनंतर पाऊस कोसळण्याची शक्यता ही ७० टक्के वर्तविण्यात आली आहे. Accuweather वर विश्वास ठेवला तर या दिवशी पावसाची 45 टक्के शक्यता आहे. जर पाऊस झालाच तर वेस्ट इंडिजसाठी दिलासा देणार आहे. पावसामुळे मॅच ड्रॉ होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान वेस्ट इंडिजचा 2-0 असा धुव्वा उडणार आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात आतापर्यंतची परिस्थिती
- टीम इंडिया - पहिला डाव: ४३८ आणि दुसरा डाव: १८१/२ (घोषित)
- लक्ष्य - 365
- वेस्ट इंडिज संघ - पहिला डाव : २५५ आणि दुसरा डाव : ७६/२