किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात हॅट्रिकसह सहा बळी मिळवले. पण बुमरा जेव्हा प्रकाशझोतात आला तेव्हा त्याच्या गोलंदाजी शैलीवर काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे म्हटले जात होते. त्यावेळी बुमरच्या मदतीसाठी भारताचे माजी महान फलंदाज धावून आले.
बुमरा गोलंदाजी करत असताना गावस्कर यांच्यासह वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज इयान बिशप हे समालोचन करत होते. त्यावेळी बिशप यांनी बुमराच्या गोलंदाजीच्या शैलीवर बऱ्याच लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, असे म्हटले. त्यावर गावस्कर म्हणाले की, " बुमराच्या गोलंदाजीच्या शैलीवर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांची नावं तर मला सांगा? " यानंतर बिशप यांना काहीच बोलता आले नाही. त्यामुळे बुमरासाठी गावस्कर धावून आले, असे चाहते म्हणत होते.
रोहित शर्माला मिळू शकतो कसोटी संघात स्थान; हा आहे फॉर्म्युला
भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये स्थान देण्यात आले नाही. पण आता आगामी कसोटी सामन्यांमध्ये मात्र रोहितला संघात स्थान देता येऊ शकते. कारण रोहितला संघात खेळवण्याचा फॉर्म्युला आता तयार झाला आहे. पण हा फॉर्म्युला नेमका आहे तरी काय, जाणून घ्या...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी रोहितला संघात स्थान द्यायला हवे, या विषयावर भरपूर चर्चा झाली होती. त्यामुळे पहिल्या सामन्यात रोहितला संघात स्थान मिळेल, असे म्हटले जात होते. पण रोहितला पहिल्या सामन्यात स्थान दिले नाही. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तरी रोहित खेळेल, असे वाटले होते. पण रोहितला दुसऱ्या सामन्यातही संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितला स्थान मिळवून द्यायचा फॉर्म्युला समोर आल्याचे म्हटले जात आहे. रोहितच्या जागी संघात अष्टपैलू हनुमा विराहीला संधी देण्यात आली. पण विहारीने दमदार कामगिरी करत आपले स्थान कायम राखले. पण सध्याच्या घडीला लोकेश राहुल हा चांगल्या फॉर्मात दिसत नाही. त्यामुळे जर राहुलला वगळण्यात आले तरच रोहितला संघात स्थान मिळू शकते, असे म्हटले जात आहे. गेल्या 12 सामन्यांमध्ये राहुलची 44 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचबरोबर सात डावांमध्ये राहुलला दोन अंकी धावसंख्याही उभारता आलेली नाही.
विराट कोहलीने लाज आणली; नावावर झाला नकोसा विक्रम
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या नावावर नकोसा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात कोहली पहिल्याच चेंडूवर आऊट झाला. 'गोल्डन डक' होण्याची ही त्याची चौथी वेळ होती. त्याचबरोबर सध्याच्या नावाजलेल्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होण्याच्या यादीमध्ये कोहली पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
सध्याच्या घडीला क्रिकेट जगतामध्ये केन विल्यमसन, जो रूट, स्टीव्हन स्मिथ आणि कोहली हे नावाजलेले फलंदाज आहेत. या सामन्या कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे कोहली आतापर्यंत 9 वेळा शून्यावर बाद झाला आहे. स्मिथ आतापर्यंत चार वेळा शून्यावर बाद झाला आहे, तर जो रूट सातवेळा शून्यावर बाद झाला आहे. या सामन्यापूर्वी कोहली आणि विल्यमसन हे प्रत्येकी आठ वेळा शून्यावर बाद झाले होते. पण या सामन्यात कोहली शून्यावर बाद झाला. त्यामुळे कोहलीच्या नावावर नऊ भोपळे जमा झाले आहेत.
टीम इंडियाकडून 468 धावांचे टार्गेट, वेस्ट इंडिजच्या 2 बाद 45 धावा
हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांत गुंडाळला. यासह भारताने तब्बल 299 धावांची भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यानंतर, फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाने 168 धावांवर 4 गडी बाद असताना डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला 467 धावांचे लक्ष्य पार करायचे आहे.
भारताने 117 धावांत डाव गुंडाळूनही वेस्ट इंडिजला यजमानांवर फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला नाही. भारताच्या 467 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजचे 45 धावांवर 2 गडी बाद झाले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी 423 धावांची गरज असून दोन दिवस आणि 8 फलंदाज त्यांच्याकडे आहेत. दरम्यान, भारताच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने नाबाद 64 तर हनमा विहारीने नाबाद 53 धावांची खेळी केली.
पहिल्या डावात बुमराहने 27 धावांत 6 गडी बाद करीत वेस्ट इंडीजचे पहिले पाच फलंदाज तंबूत धाडले. यात त्याने हॅट्ट्रिकही नोंदवली. कसोटीत हॅट्ट्रिक नोंदवणारा बुमराह हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांच्यानंतरचा तिसरा भारतीय गोलंदाज बनला. शनिवारी बुमराहच्या भेदकतेला यजमान संघाच्या फलंदाजांकडे उत्तरच नव्हते. याशिवाय मोहम्मद शमीनेही २ बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली. तसेच इशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. बुमराहने सातव्या षटकांत विकेट घेण्याची मालिका सुरू केली. सर्वात आधी त्याने जॉन कॅम्पबेलला बाद केले. त्याचा झेल ऋषभ पंतने लीलया घेतला. त्यानंतर नवव्या षटकात बुमराहने सलग चेंडूंत डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रुक्स आणि रॉस्टन चेज यांना तंबूत धाडत आपला दबदबा निर्माण केला. ब्राव्होचा झेल दुसºया स्लीपमध्ये उभ्या असणाºया लोकेश राहुलने घेतला आणि पुन्हा पुढील दोन चेंडूंवर ब्रुक्स व चेज यांना पायचीत केले.
Web Title: India vs West Indies, 2nd test: ... Sunil Gavaskar rushed to help jasprit bumrah
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.