किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने वेस्ट इंडिजवर कसोटी मालिकेत 2-0 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर कोहलीने भारताकडून सर्वाधिक सामने जिंकण्याचा इतिहास रचला. पण ज्यावेळी कोहलीला कॅप्टन्सीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, कॅप्टन्सी म्हणजे फक्त 'C' आहे. कोहलीच्या या विधानाचा अर्थ तुम्हाला समजला का...
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सहजच विजय मिळवला. भारताने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 210 धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे, 257 धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने कसोटी मालिका जिंकली. जमैकाच्या सबीना पार्क मैदानावर चौथ्या दिवशीच्या खेळावेळी आश्चर्यकारक घटना घडली आहे. वेस्ट इंडिजचे फलंदाज डरेन ब्राव्हो मैदानातून परतला होता. जमैकाच्या पर्यावरणातील बदल आणि तापमानामुळे ब्राव्होला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे मैदानामध्ये फिजिओ आले आणि त्याला बाहेर घेऊन गेले होते.
हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताने तब्बल 299 धावांची भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यानंतर, फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाने 168 धावांवर 4 गडी बाद असताना डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला 467 धावांचे लक्ष्य पार देण्यात आले होते.
सामन्यानंतर कोहलीला नेतृत्वाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर कोहली म्हणाला की, " कॅप्टन्सी म्हणजे फक्त 'C' आहे. कारण हा विजय फक्त माझ्या एकट्याचा नाही तर हा संपूर्ण संघाचा आहे. फक्त एक खेळाडू किंवा कर्णधार हा विजय मिळवू शकत नाही. कारण हा सांघिक खेळ आहे. त्यामुळे विजयासाठी प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्वाचे असते."
विराट कोहलीने रचला इतिहास; ठरला सर्वोत्तम कर्णधार
भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या धर्तीवर इतिहास रचला आहे. कारण अशी कामगिरी करणारा तो भारताचा सर्वोत्तम कर्णधार ठरला आहे. कारण कोहलीसारखी कामगिरी भारताच्या एकाही कर्णधाराला करणे जमलेले नाही.
कोहलीनं परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांत गांगुलीला ( 11 विजय) मागे टाकले आहे. कोहलीनं 27 सामन्यांत 13 विजय मिळवले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात सहा कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. शिवाय भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय आता कोहलीच्या नावावर आहेत. कोहलीच्या नावावर आता 28 कसोटी विजय आहेत आणि कोहलीने धोनीला (27 विजय) पिछाडीवर सोडले आहे. कोहलीनं 48 कसोटीत हा पराक्रम केला आणि धोनीपेक्षा 12 सामने कमी खेळून त्याने ही मजल मारली आहे.
Web Title: India vs West Indies, 2nd test: Virat Kohli says, Capacity is just 'C' ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.