किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून किंगस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातही विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.
अजिंक्य रहाणेने झळकावलेले दहावे शतक व हनुमा विहारीच्या 93 धावांनंतर जसप्रीत बुमराहने अवघ्या 7 धावांत घेतलेल्या 5 बळींमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 318 धावांनी धुव्वा उडविला. चौथ्या दिवशी विजयासाठी 419 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान दुसऱ्या डावात 100 धावांवर गारद झाला. इशांतने 31 धावांत 3 तर, शमीने 13 धावांत 2 बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली.
- सामन्याची वेळः रात्री 8 वाजल्यापासून
- थेट प्रक्षेपणः Sony Ten 1/HD
संभाव्य संघ :
- भारत- विराट कोहली. मयांक अग्रवाल, लोकेश राहुल/रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विराही, रिषभ पंत, रवींद्र जडेजा/आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
- वेस्ट इंडिज - जेसन होल्डर, क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शॅमर्ह ब्रुक्स, जॉन कॅम्प्बेल, रोस्टन चेस, रॅहकिम कोर्नवॉल, जॅहमर हॅमिल्टन, शेनॉन गॅब्रिएल, शिमरॉन हेटमायर, शे होप, किमो पॉल, केमार रोच.