भारताने २०० धावांनी दणदणीत विजय मिळवला; सलग १३ वन डे मालिकेत मारली बाजी

India vs West Indies 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:27 AM2023-08-02T02:27:47+5:302023-08-02T02:28:09+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies 3rd ODI Marathi : India have defeated West Indies by 200 runs to seal the ODI series 2-1, India's 13th consecutive bilateral ODI series win against West Indies | भारताने २०० धावांनी दणदणीत विजय मिळवला; सलग १३ वन डे मालिकेत मारली बाजी

भारताने २०० धावांनी दणदणीत विजय मिळवला; सलग १३ वन डे मालिकेत मारली बाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका २-१ अशी जिंकली. शुबमन गिल, इशान किशन, हार्दिक पांड्या व संजू सॅमसन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मुकेश कुमारने पहिल्याच स्पेलमध्ये विंडीजचे ३ फलंदाज १७ धावांवर तंबूत पाठवले. शार्दूल ठाकूरने ४ व कुलदीप यादवने २ धक्के दिले आणि भारताचा दणदणीत विजय पक्का केला.  विंडीजविरुद्धचा हा सलग १३ वा वन डे मालिका विजय ठरला. २००७ पासून भारतीय संघ अपराजित आहे.

शुबमन गिलने मोडला पाकिस्तानी फलंदाजाचा वर्ल्ड रेकॉर्ड; इशान किशनचाही विक्रमांचा पाऊस


इशान व शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धाव जोडल्या. इशान ८ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावांवर बाद झाला. संजू सॅमसनने ४१ चेंडूंत २ चौकार व ४ खणखणीत षटकार खेचून ५१ धावांची खेळी केली. शुबमन ९२ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ८५ धावांवर झेलबाद झाला. या विकेटनंतर हार्दिक व सूर्यकुमार यादव यांनी चांगला खेळ करताना ४९ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. सूर्या ३० चेंडूंत ३५ धावांवर झेलबाद झाला. हार्दिकने ५२ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७० धावा करताना भारताला ५ बाद ३५१ धावांपर्यंत पोहोचवले. एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नसूनही भारताने केलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.  यापूर्वी २००५मध्ये श्रीलंकेविरुद्ध ६ बाद ३५० धावा भारताने केल्या होत्या. 


वेस्ट इंडिजच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना मुकेश कुमारने १७ धावांतच माघारी पाठवले होते. मुकेशने त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये ५-१-१५-३ अशी गोलंदाजी केली. जयदेव उनाडकटने त्याच्या पहिल्या षटकात विंडीजला चौथा धक्का दिला. शार्दूल ठाकूरनेही त्याच्या पहिल्या षटकात शिमरोन हेटमारयची विकेट मिळवून दिली. विंडीजचे मनोबल ढासळले. शार्दूलच्या बाऊन्सरवर रोमारिओ शेफर्डने फटका मारला अन् तो जयदेवने सीमारेषेवर अचूक टिपला. २०१९च्या वन डे वर्ल्ड कपनंतर भारताकडून शार्दूलने सर्वाधिक ५० विकेट्स घेतल्या. ( मुकेश कुमारच्या ३ विकेट्स पाहा


कुलदीपने सलग दोन षटकं निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या षटकात एलिक एथानेझचा त्रिफळा उडवला.  यानिक कारिया  ( १९) चांगले फटके मारत होता, परंतु कुलदीपने त्याला LBW केले.  गुडाकेश मोती व अल्झारी जोसेफ यांनी नवव्या विकेटसाठी चांगली खिंड लढवली आणि ६० चेंडूंत ५५ धावांची भागीदारी केली.  अल्झारीला २६ धावांवर बाद करून शार्दूलने ही भागीदारी तोडली. शार्दूलने अखेरची विकेट घेत विंडीजचा संघ १५१ धावांत तंबूत पाठवला. भारताने २०० धावांनी हा सामना जिंकला. शार्दूलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. गुडाकेश ३९ धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: India vs West Indies 3rd ODI Marathi : India have defeated West Indies by 200 runs to seal the ODI series 2-1, India's 13th consecutive bilateral ODI series win against West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.