Join us  

वेस्ट इंडिज ते वेस्ट इंडिज! ९ वर्ष, २५२ दिवसानंतर भारताच्या वन डे संघात 'या' खेळाडूचे पुनरागमन

India vs West Indies 3rd ODI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व निर्णायक वन डे सामना आज होत आहे आणि आजही रोहित शर्मा व विराट कोहली बाकावर बसून आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 8:11 PM

Open in App

India vs West Indies 3rd ODI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व निर्णायक वन डे सामना आज होत आहे आणि आजही रोहित शर्मा व विराट कोहली बाकावर बसून आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदलांसह मैदानावर उतरला आहे. अक्षर पटेल आणि उम्रान मलिका यांच्याजागी ऋतुराज गायकवाड व जयदेव उनाडकट संघात खेळत आहेत. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला बोलावले आहे. इशान किशन व शुबमन गिल या दोघांनी पहिल्या १० षटकांत ७३ धावा चोपल्या आणि नशीबाचीही त्यांना साथ मिळाली. इशानचा एक झेल विंडीजच्या खेळाडूने सोडला अन् त्याने उत्तुंग फटकेबाजी केली. 

टीम इंडिया कसा जिंकणार वर्ल्ड कप? १० वन डे सामने शिल्लक तरी 'तळ्यात मळ्यात'; अनेक प्रश्न अनुत्तरीत

इशानने या वन डे मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावून सातत्य दाखवून दिले. त्याने शुबमन गिलसह १३.२ षटकांत फलकावर शंभर धावा चढवल्या आहेत. या सामन्यात जयदेव उनाडकटने ( Jaydev Undadkat) जवळपास १० वर्षांनंतर भारताच्या वन डे संघात पुनरागमन केले. ९ वर्ष व २५२ दिवस, असे दोन वन डे सामन्यात सर्वाधिक गॅप राहिलेला तो भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी रॉबिन सिंगच्या ( १९८९-९६) दोन सामन्यांमधील अंतर हे ७ वर्ष व २३० दिवसांचे होते. त्यानंतर अमित मिश्रा ( ६ वर्ष व १६० दिवस), पार्थिव पटेल ( ६ वर्ष व १३३ दिवस) आणि रॉबिन उथप्पा ( ५ वर्ष व ३४४ दिवस) यांचा क्रमांक येतो.  

सामन्यांच्या बाबतीत म्हणायचे तर जयदेवच्या या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ १९३ मॅच खेळला. साईराज बहुतुल्ले याला १९६ सामने मुकावे लागले होते. जयदेव २०१३ मध्ये कोची येथे वेस्ट इंडिजविरुद्धच शेवटची वन डे मॅच खेळला होता अन् आज त्याने विंडीजविरुद्धच पुनरागमन केले. २०१३च्या संघात रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी हे होते. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ
Open in App