गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : कायरन पोलार्डने दमदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. पोलार्डच्या अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजला भारातापुढे 147 धावांचे आव्हान ठेवता आले.
पाऊस पडून गेल्यामुळे भारताने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या निर्णयाचा चांगलाच फायदा दीपक चहरने घेतला. त्याने वेस्ट इंडिजच्या पहिल्या तीन फलंदाजांना बाद केले. पण त्यानंतर मात्र पोलर्डने एकाकी झुंज लढवत अर्धशतक झळकावले. पोलार्डने 45 चेंडूंमध्ये सहा षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर 58 धावांची खेळी साकारली.
भारताचा फॉर्मात असलेला सलामीवीर रोहित शर्माला तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यातून वगळण्यात आले आहे. रोहितच्या जागी सलामीवीर म्हणून लोकेश राहुलला संघात स्थान देण्यात आले आहे.
तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यावर पावसाचे सावट? काय सांगोतय हवामानाचा अंदाजभारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे.
दुसऱ्या सामन्यातही पाऊस पडला होता. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला 15 षटके फलंदाजी करता आली होती. पाऊस सातत्याने पडत असल्यामुळे हा सामना थांबवण्याचा निर्णय घेतला होता. डकवर्थ-लुईस नियमांनुसार या सामन्यात भारताला विजयी घोषित करण्यात आले होते. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात पाऊस पडणार का, हा प्रश्न साऱ्यांना पडलेला आहे.