गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने तीन सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यातही विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. मालिका आधीच खिशात घातल्यामुळे भारतीय संघ आजच्या सामन्यात काही बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दीपक चहर, लोकेश राहुल. श्रेयस अय्यर, राहुल चहर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
राहुल कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, पण आजच्या सामन्यात त्याचा सलामीसाठी विचार केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत शिखर धवन किंवा रोहित शर्मा यांच्यापैकी एकाला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. धवनला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे त्याच्याजागी राहुल खेळू शकतो. कर्णधार विराट कोहलीही विश्रांती घेण्यास प्राधान्य देईल. त्याच्याजागी श्रेयस अय्यर अंतिम अकरात एन्ट्री घेईल.
संघात आणखी दोन बदल अपेक्षित आहेत. राहुल व दीपक चहर यांना भारताच्या गोलंदाजी विभागात संधी मिळू शकते. नवदीप सैनी, खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर हे सध्या अंतिम अकरामध्ये आहेत आणि त्यांची कामगिरीही चांगली झाली आहे. दीपकला भुवनेश्वर कुमारच्या जागी संघी मिळू शकते. राहुलला सुंदर किंवा रवींद्र जडेजा यांच्या जागी स्थान मिळू शकते. कृणाल पांड्या संघात कायम राहिल.
संभाव्य संघभारत - रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मनिष पांडे, कृणाल पांड्या, राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, नवदीप सैनी, खलील अहमद.
वेस्ट इंडिज - एव्हिन लुइस, सुनील नरीन, निकोलस पुरन, शिमरोन हेटमायर, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉव्हेल, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, खॅरी पिएरे, शेल्डन कोट्रेल, ओशाने थॉमस.
विंडीजच्या किरॉन पोलार्डला आयसीसीनं फटकारलं, सुनावला दंडविंडीजच्या किरॉन पोलार्डला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं चांगलंच फटकारलं आहे. पंचांनी वारंवार दिलेल्या सूचनांचं त्यानं उल्लंघन केले, त्यामुळे त्याला आयसीसीनं दंड सुनावला. पोलार्ड आयसीसीच्या 2.4 कलमांतर्गत दोषी आढळला आहे. सामना सुरू असताना पोलार्डनं बदली खेळाडूची मागणी केली होती. पण, पंचांनी त्याला षटक संपल्यानंतर बदली खेळाडू बोलाव, अशी सूचना केली होती. मात्र, पोलार्डनं या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलार्डनं मात्र हे आरोप अमान्य केले आहेत. त्याला आयसीसीनं सामन्यातील मानधनाची 20 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितले आहे.