अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या बरेच विक्रम मोडीत काढत आहे. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने बरेच विक्रम कोहलीने मोडीत काढले आहेत. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्ज आहे. पण सुनील गावस्कर यांचा विक्रम कोहली मोडू शकतो का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वोत्तम विक्रम गावस्कर यांचा आहे. गावस्कर यांनी आपल्या वेस्ट इंडिजच्या पहिल्याच दौऱ्यात छाप पाडली होती. त्यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने विजयही मिळवला होता. गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 13 शतके लगावली आहेत. भारताकडून एकाही फलंदाजाला एवढी शतके लगावता आलेली नाहीत. गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या 27 कसोटी सामन्यांमध्ये 2749 धावा फटकावल्या आहेत. त्यांची 27 सामन्यांमधली सरासरी 65 एवढी आहे.
गावस्कर यांनी 1983 साली चेन्नई येथे झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 236 धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. ही खेळी अजूनपर्यंत क्रिकेट चाहत्यांच्या मनामध्ये कायम आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एका सामन्यात गावस्कर यांनी चक्क 10 तास फलंदाजी केली होती. यावेळी त्यांनी एकट्याने 70पेक्षा जास्त षटकांचा सामना केला होता.
कोहलीने दाखवले 8 पॅक अॅब्स, तर रोहितने लपवलं सुटलेलं पोट भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना उद्यापासून सुरु होणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतीय संघाने समुद्रकिनारी जाऊन मजा-मस्ती केली. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपले 8 पॅक अॅब्स दाखवले, तर दुसरीकडे रोहित शर्मा मात्र आपलं सुटलेलं पोट लपवताना दिसला.
कोहलीने एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर टाकला आहे. या फोटोमध्ये विराटसह मयंक अग्रवाल, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि लोकेश राहुल दिसत आहेत. भारतीय खेळाडूंबरोबर सपोर्ट स्टाफही दिसत आहे. यावेळी सर्वांनी आपली टी-शर्ट्स काढली होती. त्यामुळे कोहलीचे 8 पॅक अॅब्स दिसत होते. या फोटोमध्ये आता आपले पोट दिसणार म्हणून रोहित राहुल आणि रहाणे यांच्या मागे लपताना दिसला.