India vs West Indies : हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल मैदानात 'हे'  काय करत होते...

नेमके हे दोघे काय करत होते, हे मात्र कुणाला समजू शकलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 10:20 PM2019-06-27T22:20:21+5:302019-06-27T22:23:20+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies: Hardik Pandya and Lokesh Rahul were doing 'this' in the field ... | India vs West Indies : हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल मैदानात 'हे'  काय करत होते...

India vs West Indies : हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल मैदानात 'हे'  काय करत होते...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवलेली होती. भारताने दमदार फलंदाजीच्या जोरावर २६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताचे गोलंदाज भेदक मारा करत होते. पण त्यावेळीच हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल मैदानात 'हे'  दोघे काही तरी वेगळीच गोष्ट करत होते. ही गोष्ट नेमकी काय होती...

भारत क्षेत्ररक्षण करत असताना हार्दिक जमिनीवर झोपलेला पाहायला मिळाला. तर राहुल हा त्याच्यावर बसलेला पाहायला मिळाला. नेमके हे दोघे काय करत होते, हे मात्र कुणाला समजू शकलेले नाही. हा कोणत्या प्रकाराचा व्यायाम होता, याची उत्सुकता चाहत्यांनाही आहे.
 


दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानेवेस्ट इंडिजवर दममाखदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ ११ गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २६८ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाटलाग करताना वेस्ट इंडिजचेफलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान गोलंदाजीचे शिकार ठरले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला भारताचे आव्हान पेलवले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

विराट कोहलीने रचलेल्या भारताच्या धावसंख्येच्या पायावर महेंद्रसिंग धोनीने चांगलाच कळस रचला. त्यामुळे भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 268 धावा करता आल्या. कोहली-पंड्या यांच्याबरोबरच हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांचेही उपयुक्त योगदान मिळाले. कोहलीने या सामन्यात ७२ धावा केल्या आणि धोनीने नाबाद ५६ धावांची खेळी साकारली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघा या सामन्यात मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण भारताला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. रोहितला या सामन्यात फक्त १८ धावाच करता आल्या.

रोहित बाद झाल्यावर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी चांगलीच जमली. पण अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त दोन धावांची गरज असताना राहुल बाद झाला. केमार रोचने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. रोचचा हा स्पेल भन्नाट होता. कारण या स्पेलमध्ये रोहितनंतर विजय शंकर आणि केदार जाधव यांना बाद केले. या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही.

केदार जाधव बाद झाल्यावर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला. या सामन्यात धोनीला यष्टीरक्षक शाई होपकडून जीवदान मिळाले. कोहलीने यावेळी अर्धशतक पूर्ण करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २० धावांचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला, या यादीमध्ये आता कोहली अव्वल स्थानावर आहे. अर्धशतक झळकावल्यावर कोहली शतकाच्या दिशेने कूच करत होता. पण एक चूक त्याला चांगलीच भोवली आणि शतक पूर्ण न करताच तो बाद झाला. कोहलीने ८२ चेंडूत ८ चौकारांच्या जोरावर ७२ धावा केल्या. कोहली बाद झाल्यावर धोनी आणि हार्दिक पंड्या यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.

Web Title: India vs West Indies: Hardik Pandya and Lokesh Rahul were doing 'this' in the field ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.