मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. वेस्ट इंडिज : विजयी मालिका कायम राखण्यासोबतच उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ आज वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघाने पाच सामन्यांत चार विजय मिळवले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झालेला आहे. 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेला भारतीय संघ आजच्या लढतीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या अधिक नजीक पोहोचणार आहे. विंडीजचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे, परंतु जाता जाता बलाढ्य संघांना धक्का देण्याची धमक ते दाखवू शकतात.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कार्लोस ब्रॅथवेटने केलेली तुफानी खेळी सर्वांच्या स्मरणात राहणारी आहे. पण, पाच धावांनी पत्करावा लागल्याने त्यांच्या उपांत्य फेरीच्या अपेक्षांन सुरुंग लावला. पण, तरीही अन्य संघांच्या कामगिरीवर विंडीजच्या किंचितशा आशा कायम आहेत. त्यामुळे भारताविरुद्ध विजयासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. पावसामुळे भारतीय खेळाडूंना इनडोअर अकादमीत सराव करावा लागला. पण, आज येथे लख्ख सुर्यप्रकाश असणार आहे. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यताच नाही. 21 ते 23 डिग्री सेल्सियस असे तापमान असण्याची शक्यता आहे.
खेळपट्टीचा अंदाजया मैदानावर आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेचे तीन सामने झालेत आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारलेली आहे. सुर्यप्रकाश असल्याने खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी असणार आहे. फिरकीपटूंना थोडी साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरेल.
वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघ आठवेळा समोरासमोर आले आहेत. त्यात भारतीय संघाने पाच, तर विंडीजने तीन विजय मिळवले आहेत. 1996च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाने विंडीजविरुद्धी विजयी परंपरा कायम राखली आहे. ओल्ड ट्रॅफर्डवर उभय संघ दुसऱ्यांदा भिडतील.
हेड-टू-हेडएकूण सामने 126भारत विजयी 59विंडीज विजयी 62टाय : 2 अनिर्णित : 3