भारत विरुद्ध वेस्ट इंडिजदरम्यान झालेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 3 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरने अप्रतिम खेळ दाखवत जबरदस्त धावा कुटल्या. विशेष म्हणजे, या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत एक स्टार सलामीवीर संघात आला आहे. हा फलंदाज रोहित शर्माप्रमाणेच स्फोटक फलंदाजी करू शकतो. विंडीजविरुद्धच्या पहिल्याच वनडेमध्ये या खेळाडूने अप्रतिम खेळ करत सर्वांनाच आकर्षित केले आहे.
संघाला मिळाला जबरदस्त खेळाडू -वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शिखर धवनसोबत (Shikhar Dhawan) शुभमन गिल (Shubman Gill) मैदात उतरला. या दोन्ही खेळाडूंनी भारतीयसंघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. यावेळी शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात दिसून आला. त्याने 53 चेंडूत 64 धावा केल्या. यात 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
रोहितनं केलं होतं दूर्लक्षित - रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार झाल्यानंतर त्याने गिलला एकही संधी दिली नव्हती. शुभमन गिलने दोन वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन केले आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) 2019 मध्ये भारतीय संघात डेब्यू केले होते. मात्र, डेब्यू केल्यानंतर, सेलेक्टर्सचे त्याच्याकडे दुर्लक्ष होते. गिलने भारतासाठी 11 टेस्ट आणि 4 वनडे सामने खेळले आहेत.
रोहित प्रमाणेच स्फोटक बॅटिंग - शुभमन गिल देखील रोहित शर्मा प्रमाणेच स्पोटक बँटिंग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो लांब लांब षटकारही सहजपणे मारू शकतो. तो जेव्हा लयीत असतो, तेव्हा कुठल्याही गोलंदाजाचे धुवा उडवू शकतो. तो आता पुन्हा टीम इंडियात परतला आहे. तर सिलेक्टर्सनाही रोहित शर्माच्या बॅकअपसाठी एक धाकड फलंदाज मिळाला आहे. जो संघाला एक चांगली सुरुवात देऊ शकतो.