गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियात कमबॅक करणार आहेत. या मालिकेपूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडिज बोर्ड एकादश संघाविरुद्ध तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. उद्यापासून या सराव सामन्याला सुरुवात होणार असून यात कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार आहे.
कोहलीनं ट्वेंटी-20 मालिकेत 106 आणि वन डे मालिकेत 234 धावा केल्या. त्यानं वन डे मालिकेत सलग दोन शतकं ठोकली. परंतु तिसऱ्या सामन्यात त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याची ही दुखापत गंभीर नसली तरी आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा लक्षात घेता त्याला सराव सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका ही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत सराव सामन्यात कर्णधारपदाची जबाबदारी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर येणार आहे.
कसोटी मालिकेत रहाणेच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याता सातत्य राखण्यात अपयश आले आहे. कोहलीनं त्याची पाठराखण केली असली तरी त्याच्यावर या मालिकेत चांगली कामगिरी करण्याचे दडपण असणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विश्रांतीवर गेलेला बुमराही या मालिकेतून कमबॅक करणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्याही कामगिरीवर लक्ष असेल.
कसोटी मालिका
22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून
कसोटीसाठी भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव
Web Title: India vs West Indies : India may rest Virat Kohli for tour game vs West Indies Cricket Board XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.