फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजची दाणादाण उडवल्याचे पाहायला मिळाले. भारताने प्रथम गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर वचक ठेवला. त्यामुळेच वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारताने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच वेस्ट इंडिजला भारताला विजयासाठी 96 धावांचेच आव्हान देता आले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात भारताला यश मिळाले. त्यानंतर सातत्याने वेस्ट इंडिजचे फलंदाज बाद होत गेले. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी टिच्चून मारा केला आणि सातत्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजाना बाद केले. वेस्ट इंडिजकडून कायरन पोलार्डचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही.
मोठा धक्का, लोकेश राहुलला संघातून वगळले
विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकेश राहुलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची लोकेश राहुलला संधी, कोणता विश्वविक्रम ते जाणून घ्या...
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आजपासून ट्वेन्टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या सामन्यात भारताच्या लोकेश राहुलला वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची संधी आहे. पण हा वर्ल्ड रेकॉर्ड नेमका आहे तरी कोणता, ते जाणून घ्या...
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. विंडीज दौऱ्यावर दाखल झालेल्या भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात आजपासून होणार आहे. येथे पहिला ट्वेंटी-20 सामना आज खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासात रोहितच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. त्यानं 94 सामन्यांत 32.37च्या सरासरीनं 2331 धावा केल्या आहेत. रोहितचा हा विक्रम कोहलीला मोडण्याची संधी आहे. दुसरीकडे राहुलकडे वर्ल्ड रेकॉर्ड रचण्याची नामी संधी आहे.
लोकेश राहुलला ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा करण्यासाठी 121 धावांची गरज आहे. या मालिकेत त्यानं पहिल्याच सामन्यात ही खेळी केल्यास ट्वेंटी-20त जलद 1000 धावा करण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होईल. त्यानं 24 डावांत 879 धावा केल्या आहेत. सध्या हा विक्रम पाकिस्तानचा बाबर आझमच्या ( 26 डाव) नावावर आहे. कोहलीनं 27 डावांत 1000 धावा केल्या आहेत.
Web Title: India vs West Indies: India needed 96 runs to victory over West Indies
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.