फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजच्या माफक 96 धावांच्या आव्हानाचा भारताने यशस्वीपणे पाठलाग केला. पण हा यशस्वी पाठलाग करताना अडखळत हा सामना जिंकला. भारताला विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी सहा फलंदाज गमावावे लागले आणि वेस्ट इंडिजवर चार विकेट्स राखून विजय मिळवता आला.
पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजची दाणादाण उडवल्याचे पाहायला मिळाले. भारताने प्रथम गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर वचक ठेवला. त्यामुळेच वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. भारताने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच वेस्ट इंडिजला भारताला विजयासाठी 96 धावांचेच आव्हान देता आले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात भारताला यश मिळाले. त्यानंतर सातत्याने वेस्ट इंडिजचे फलंदाज बाद होत गेले. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी टिच्चून मारा केला आणि सातत्याने वेस्ट इंडिजच्या फलंदाजाना बाद केले. वेस्ट इंडिजकडून कायरन पोलार्डचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही.
मोठा धक्का, लोकेश राहुलला संघातून वगळलेविश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकेश राहुलला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.