फ्लोरिडा, भारत आणि वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दोन्ही संघांची ही पहिलीच मालिका आहे. पण, पहिल्या सामन्यापूर्वीच वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू आंद्रे रसेलने या मालिकेतून माघार घेतली आहे. दुखापतीतून तो पूर्णपणे सावरला नसल्यानं त्याला माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी जेसन मोहम्मदला बोलावण्यात आले आहे.
भारतीय संघाला सडेतोड उत्तर देण्यासाठी यजमान विंडीजनंही कंबर कसली आहे. त्यांनी पहिल्या दोन ट्वेंटी-20 सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यात रसेलचा समावेश होता. नुकतीच त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यामुळे तंदुरुस्ती चाचणीनंतर त्याच्या खेळण्यावर शिक्कमोर्तब होणार होती, पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली.
जाणून घेऊया या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
3 ऑगस्ट, पहिला सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
4 ऑगस्ट, दुसरा सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
6 ऑगस्ट, तिसरा सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, रात्री 8 वा. पासून
8 ऑगस्ट, पहिला सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, सायंकाळी 7 वा. पासून
11 ऑगस्ट, दुसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून
14 ऑगस्ट, तिसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून
22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून
ट्वेंटी-20 साठी वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, किरॉन पोलार्ड, पोव्हमॅन पॉव्हेल, कार्लोस ब्रॅथवेट ( कर्णधार), किमो पॉल, सुनील नरीन, शेल्डन कोट्रेल, ओशाने थॉमस, अँथोनी ब्रॅम्बले, खॅरी पिएरे.
Web Title: India vs West Indies : Jason Mohammed replaces Andre Russell in West Indies T20I squad for India series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.