भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेला टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे जर भुवी वन डे सामन्याला मुकल्यास त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. त्यात भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर उतरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला एक आठवडा शिल्लक असताना बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्ये गेला होता, पण त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचा दिलासा चाहत्यांना मिळाला होता. त्यानंतर मायदेशात परतलेला बुमराह तंदुरुस्तीसाठी कसून सराव करत आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. ही मालिका जानेवारीत होणार आहे. पण, निवड समिती प्रुमख एमएसके प्रसाद यांच्या माहितीनुसार बुमराहचं पुनरागमन लांबणीवर पडले आहे.
तंदुरूस्तीसाठी कसून मेहनत घेणारा बुमराह वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर दिसणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा सामना 18 डिसेंबरला विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी बुमराह टीम इंडियाच्या सराव सत्रात सहभाग घेणार आहे. तो येथे कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नेट्समध्ये गोलंदाजी करणार आहे. यावरून तो किती तंदुरुस्त झाला आहे, याची चाचपणी करण्यात येणार आहे. IANSनं तसं ट्विट केलं आहे.
विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁ वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक