India vs West Indies : किरॉन पोलार्डचे कौतुक करताना रोहितनं सांगितला कोहलीला पुढील धोका

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 03:42 PM2019-12-10T15:42:07+5:302019-12-10T15:43:40+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies : Kieron Pollard one of the great thinkers of the game, Say Rohit Sharma | India vs West Indies : किरॉन पोलार्डचे कौतुक करताना रोहितनं सांगितला कोहलीला पुढील धोका

India vs West Indies : किरॉन पोलार्डचे कौतुक करताना रोहितनं सांगितला कोहलीला पुढील धोका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देवेस्ट इंडिजनं दुसऱ्या सामन्यात 8 विकेट्सनं विजय मिळवलालेंडल सिमन्सची फटकेबाजीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांना केलं निष्प्रभ

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा ट्वेंटी-20 सामना बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. लेंडल सिमन्सच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं दुसरा सामना जिंकला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. या निकालामुळे तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना समसमान संधी मिळाली आहे. त्यामुळे वानखेडेवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांकडून दमदार खेळ पाहायला मिळेल, हे निश्चित आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला हिटमॅन रोहित शर्मानं विंडीज कर्णधार किरॉन पोलार्डचे कौतुक केले. त्यानं हे कौतुक करताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला जणू पुढील धोक्याची जाण करून दिली.

वानखेडे स्टेडियम आणि पोलार्ड यांचे वेगळे नाते आहे. पोलार्ड हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे आणि येथील खेळपट्टीचा त्याला चांगला अभ्यास आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात पोलार्डचा हा अनुभव संघाच्या कामी येईल, असं मत विंडीज संघाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,''वानखेडे स्टेडियमवर पोलार्ड अनेक सामने खेळला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगमुळे त्याच्या गाठीशी आलेला अनुभव उद्या संघाच्या कामी येणार आहे.''

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानंही मुंबई इंडियन्सच्या सहकाऱ्याचे कौतुक केले. तो म्हणाला,'' मुंबई इंडियन्सच्या महत्त्वांच्या निर्णयांमध्ये पोलार्डचा सहभाग असतो. दुखापतीमुळे मला एका सामन्याला मुकावे लागले होते, तेव्हा त्यानं नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. तो नक्की कसा विचार करतो हे मला माहित आहे. त्याला सामन्याची योग्य जाण असते. कोणत्या खेळाडूचा कसा उपयोग करून घ्यायचा, याचा चांगला अभ्यास आहे आणि मैदानावर त्याची कशी अंमलबजावणी करायची, हेही त्याला चांगले माहित आहे.'' 

उभय संघ यातून निवडणार

  • भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, संजू सॅमसन, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
  • वेस्ट इंडीज : किरोन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन अ‍ॅलन, ब्रेंडन किंग, दिनेश रामदीन, शेल्डन कॉटरेल, एविन लुईस, शेरफाने रुदरफोर्ड, शिमरोन हेटमायर, केरी पियरे, लेंडिल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनियर, कीमो पॉल आणि केसरिक विलियम्स.

 
 

Web Title: India vs West Indies : Kieron Pollard one of the great thinkers of the game, Say Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.