पृथ्वीच्या शतकाच्या जोरावर भारत ४ बाद ३६४
भारताला चौथा धक्का, अजिंक्य रहाणे बाद
राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर भारताची धावगती मंदावली. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी संयमी खेळी करताना संघाला 74 षटकांत 3 बाद 303 धावांपर्यंत मजल मारून दिली. विराटने अर्धशतक पूर्ण केले.
पदार्पणात शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी 134 धावांवर संपुष्टात आली. देवेंद्र बिशूने त्याच्या स्वतःच्याच गोलंदाजीवर बाद केले. चहापानापर्यंत भारताच्या 3 बाद 232 धावा झाल्या होत्या
पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा यांची दोनशेहून अधिक धावांची भागीदारी संपुष्टात आली.
पदार्पणातच पृथ्वी शॉने गुणवत्ता सिद्ध करून दाखवली. केवळ स्थानिक क्रिकेटमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने आपला दबदबा दाखवताना कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याने 99 चेंडूत 101 धावा केल्या.
उपाहारानंतरही पृथ्वी शॉ आणि
चेतेश्वर पुजारा यांनी धावांची गती कायम राखली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी केली.
अनुभवी खेळाडू लोकेश राहुल याच्यासह सलामीला आला. पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राहुल पायचीत होऊन माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉने सामन्याची सुत्र हाती घेतली. त्याने चेतेश्वर पुजारासह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्याने संघाला 23 षटकांत 1 बाद 121 धावांचा पल्ला गाठून दिला. उपहारापर्यंत या दोघांनी भारताला 1 बाद 133 धावांचा पल्ला गाठून दिला.
इंग्लंडमधील झालेल्या मानहानिकारक पराभव विसरून पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध ते संपूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार आहेत. राजकोट येथे आजपासून पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला. लोकेश राहुल शुन्यावर बाद झाला.
या सामन्यातून मुंबईकर पृथ्वी शॉ कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. लोकेश राहुल याच्यासह तो सलामीची जबाबदारी स्वीकारेल. BCCI ने या सामन्यासाठी बुधवारीच 12 खेळाडूंची निवड केली होती. आजच्या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. त्यामुळे मुंबईकर शार्दूल ठाकूरला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान पटकावता आलेले नाही.
असे आहेत संघ
Web Title: India vs west indies live update: india won toss and prithvi shaw created half century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.