हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना काही मिनिटांत हैदराबादला सुरु होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वी येथील राजीव गांधी स्टेडियममधील नॉर्थ स्टँडचे नाव बदलण्यात आले आहे. या स्टँडला भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनचे नाव देण्यात आले आहे.
आज या स्टँडचे अनावरण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या हस्ते सामन्याच्या काही वेळापूर्वी होणार आहे. हा स्टँड व्हीव्हीएस लक्ष्मण पेव्हेलियनच्या वरच्या बाजूला असणार आहे.
सध्याच्या घडीला अझर हा हैदराबाद क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष आहे. या वर्षी २७ सप्टेंबरपासून अझरने अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली आहेत. अझरने भारतासाठी ९९ कसोटी आणि ३३४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. अझरवर मॅच फिक्सिंगचा आरोप काही वर्षांपूर्वी लावण्यात आला होता. त्यावेळी त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण कालांतराने त्याच्यावरील ही बंदी बीसीसीआयने उठवली आणि पुन्हा एकदा अझर क्रिकेटमध्ये सक्रीय झाला.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेत एक अनोखी गोष्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील महत्वाचा निर्णय घेणार नसल्याचे समजत आहे. मग आता हा निर्णय घेणार तरी कोण, याची उत्सुकता आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेत नो बॉलचा महत्वाचा निर्णय आता मैदानावरील पंचांना घेता येणार नाही. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये यावरून मैदानावरील पंचांचे चुकीचे निर्णय पाहायला मिळाले होते आणि याचा फटका खेळाडूंना बसला होता. त्यामुळे हा निर्णय आता मैदानावरील पंच घेऊ शकणार नाहीत. मग आता नो बॉलचा निर्णय घेणार तरी कोण...
या मालिकेत नो बॉलबाबतचा निर्णय तिसरे पंच घेणार आहेत. जर एखादा चेंडू नो बॉल असेल तर तिसरे पंच मैदानातील अम्पायरला कळवतील आणि त्यानुसार निर्णय घेतले जातील. ही गोष्ट प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असल्याचे समजत आहे.
हिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात कोणाला मिळणार संधी; कोण करणार रोहितबरोबर ओपनिंग...भारताची सलामीची जबाबदारी रोहित शर्मावर असेल. पण रोहितबरोबर यावेळी कोणता खेळाडू सलामीला येणार, याची सर्वात जास्त चर्चा आहे. कारण शिखर धवन हा दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागी संघात संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या सामन्यात संघात पुनरागमन केलेल्या संजूला संधी मिळते का, याची उत्सुकता सर्वांना असेल.
रोहितबरोबर सलामीला यावेळी संजूपेक्षा लोकेश राहुलला पसंती देण्यात येईल, असे म्हटले जात आहे. कारण राहुलकडे अनुभव आहे आणि त्याने गेल्या काही दिवसांमध्ये स्थानिक सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या स्थानावर कर्णधार विराट कोहली आणि चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यरला संधी मिळू शकते. कोहलीचा भरपूर विश्वास रिषभ पंतवर आहे, त्यामुळे त्याला या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले जाऊ शकते.
पंतनंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतील. त्यानंतर भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल यांना स्थान मिळू शकते.