भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांचा बोलबाला राहिला. राहुलच्या शतकी खेळीनंतर रोहित नावाचं वादळ विशाखापट्टणममध्ये घोंगावलं. रोहितनं तुफान फटकेबाजी करताना 159 खेळी केली. रोहितची घोडदौड 44 व्या षटकात रोखण्यात विंडीजला यश आलं, परंतु त्यानं तोपर्यंत विक्रमांचा पाऊस पाडला होता. रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनीही विंडीज गोलंदाजांना धू धू धुतले. त्यांच्या फटकेबाजीनं भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. या सामन्यात रोहितनं असा एक विक्रम केला, की त्यानं पाकिस्तानलाच मागे टाकले.
रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इतिहासात कुणालाच जमला नाही हा पराक्रमरोहित शर्मानं मोडला स्वतःचाच विक्रम, 'हिटमॅन' नावाला साजेशी कामगिरी2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही रोहितनं नावावर केला. सरत्या वर्षातील हे त्याचे 12वे अर्धशतक ठरले. त्यानं वेस्ट इंडिजच्या शे होप व टीम इंडियाच्या विराट कोहली यांचा 11 अर्धशतकांचा विक्रम मोडला. रोहितनं त्यानंतर धावांचा वेग वाढवला. त्यानं अर्धशतकाचे शतकात रुपातंर करताना 107 चेंडूंत 100 धावा केल्या. वनडेतील त्याचे हे 28वे शतक ठरलं, तर वेस्ट इंडिजविरुद्धचे तिसरे शतक ठरले. त्यापाठोपाठ राहुलनंही 103 चेंडूंत शतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे तिसरे शतक आहे. पण, 37व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लोकेश झेलबाद झाला. अल्झारी जोसेफनं त्याला 102 धावांवर माघारी पाठवले.
रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली, विराटसह विंडीजच्या शे होपलाही टाकलं मागे
रोहित शर्मानं मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम, ठरला अव्वल
विशाखापट्टणमवर धावांचा पाऊस पाडणारा कोहली आज पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. त्यानंतर रोहितची बॅट चांगलीच तळपली. 44व्या षटकात रोहितचा झंझावात थांबला. कोट्रेलनं त्याला बाद केले. रोहितनं 138 चेंडूंत 17 चौकार व 5 षटकारांसह 159 धावा चोपल्या. रोहित माघारी परतल्यानंतर रिषभ पंतनं चोपून काढले. रिषभ 16 चेंडूंत 39 धावा करून माघारी परतला. यासह रिषभ आणि अय्यर यांची 24 चेंडूंतील 73 धावांची भागीदारीही संपुष्टात आली. या जोडीनं रोस्टन चेसच्या एका षटकात 31 धावा चोपून काढल्या. अय्यर 32 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार मारून 53 धावांत माघारी परतला. भारताना 5 बाद 387 धावा चोपल्या.
रोहितची कर्णधार कोहलीवर कुरघोडी, 2019मध्ये कुणालाच जमली नाही अशी कामगिरी
रिषभ-अय्यर जोडीनं मोडला तेंडुलकर-जडेजाचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रम
विराट कोहलीचा 'Golden Duck'; तब्बल 7 वर्षांनी ओढावली नामुष्कीरोहितनं या सामन्यात असा एक विक्रम केला की ज्याच्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघच फेल ठरला. रोहितनं वन डे क्रिकेटमध्ये आठव्यांदा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या. पाकिस्तानच्या संपूर्ण संघातील फलंदाजांना केवळ 5 वेळाच अशी कामगिरी करता आलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहितनं विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई करताना पाकिस्तानलाही झोडपलं.