फ्लोरिडा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात डकवर्थ लुईसनुसार 22 धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पण, भारताचा युवा गोलंदाज नवदीन सैनीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) कारवाई केली आहे. सैनीनं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
ट्वेंटी-20त सर्वाधिक धावांचा विक्रम कॅप्टन कोहलीच्या नावावर; कोण होतं टॉप?तिसऱ्या सामन्यात दिग्गजांना विश्रांती मिळणार, टीम इंडियात नवे चेहरे दिसणार!
सैनीनं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 17 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यापैकी दोन विकेट या पदार्पणाच्या पहिल्याच षटकात त्यानं टिपल्या. पण, त्या सामन्यात त्यानं आयसीसीच्या 2.5 या नियमाचे उल्लंघन केले. त्यानं विंडीज फलंदाजाला बाद केल्यानंतर आक्रमकपणे त्याला डिवचले. त्यामुळे आयसीसीनं त्याला एक डिमेरीट्स पॉईंट्स दिले. डावाच्या चौथ्या षटकात ही प्रसंग घडला. सैनीनं विंडीजच्या निकोलस पुरनला बाद केले आणि त्यानंतर त्याचा डिवचले. सैनीनं आपली चूक मान्य केली आहे.
ट्वेंटी-20त रोहित शर्माच 'हिट'; पाहा थक्क करणारे विक्रम!
रोहितनं मोडला 'युनिव्हर्सल बॉस' गेलचा विश्वविक्रम!
दुसरा ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानं डकवर्थ लुईसनुसार भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले. भारताच्या 5 बाद 167 धावांचा पाठलाग करताना विंडीजनं 15.3 षटकांत 4 बाद 98 धावा केल्या होत्या. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे पुढील खेळ झालाच नाही आणि भारताने डकवर्थ लुईसनुसार 22 धावांनी विजय निश्चित केला. या विजयासह भारताने तीन ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात रोहित शर्मानं ( 67) अर्धशतकी खेळी करत अनेक विक्रम मोडले, तर कृणाला पांड्यानं 23 धावांत 2 विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.