गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : सध्याच्या घडीला भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळत आहे. पण या संघामध्ये महेंद्रसिंग धोनी नाही. कारण विश्वचषकानंकर धोनीने भारतीय आर्मीबरोबर काही काळ व्यतित करण्याचे ठरवले होते. त्यामुळे धोनी हा सध्या भारतीय संघाबरोबर नाही. पण वेस्ट इंडिविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीला धोनीची आठवण आल्यावाचून राहीली नसेल. पण नेमके असे घडले तरी काय...
पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात फक्त 13 षटकांचा खेळ झाला. पण या 13 षटकांमध्येच कोहलीला धोनीची आठवण आल्याचे पाहायला मिळाले. धोनी जेव्हा संघात असतो तेव्हा तो युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर तो काही निर्णयांमध्ये महत्वाची भूमिकाही बजावत असतो.
पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या चौथ्या षटकात एक गोष्ट घडली आणि कोहलीला धोनीची आठवण आली. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर वेस्ट इंडिजचा सलामीवीर इव्हिन लुईस चकला आणि चेंडू पॅडवर आदळला. त्यानंतर शमीने जोरदार अपील केली, पण मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. यावेळी रीव्ह्यू घ्यायचा की नाही, हे कोहलीने यष्टीरक्षक रिषभ पंतला विचारले. पण पंतने यावेळी योग्य निर्णय सांगितला नाही. त्यामुळे कोहलीने रीव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने या चेंडूचा रीप्ले दाखवण्यात आला. त्यावेळी हा चेंडू थेट स्टम्पला लागत असल्याचे दिसत होते. त्यामुळे पंतने जर रीव्ह्यू घ्यायला सांगितला असता तर लुईस आऊट झाला असता. त्यावेळी कोहलीला धोनीची आठवण आली असेल. कारण धोनी बहुतांशी वेळा रीव्ह्यू घ्यायचा की नाही, याबाबत योग्य निर्णय घेतो.
सामना रद्द झाला; पण गेलने इतिहास रचलाभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना रद्द झाला. पण सामना रद्द झाला असला तरी वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेने मात्र इतिहास रचला आहे. नेमके गेलने या सामन्यात केले तरी काय, ते जाणून घ्या...
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्यात 13 षटकांचा खेळ झाला.पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करावा लागला. गेलला या सामन्यात फक्त तीन धावा करता आल्या. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने गेलला क्लीन बोल्ड केले. गेलला या सामन्यात फक्त तीनच धावा करता आल्या. पण तीन धावा करूनही गेलने रेकॉर्ड रचला आहे.
भरताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गेल खेळला आणि वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक लढती खेळण्याचा विक्रम आता गेलच्या नावावर झाला आहे. भारताविरुद्धचा गेलचा हा 296 वा एकदिवसीय सामना होता. गेलने यावेळी वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे. लाराच्या नावावर 295 एकदिवसीय सामने आहेत.