Join us  

India vs West Indies ODI : कोहलीच्या निशाण्यावर जावेद मियाँदादचा विक्रम, गांगुलीलाही टाकू शकतो मागे

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने वन डे मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आज गयाना येथे होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 11:41 AM

Open in App

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने वन डे मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आज गयाना येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची नजर एका विशेष विक्रमावर असणार आहे. या सामन्यात 19 धावा करताच कोहलीच्या नावावर एक विक्रम नोंदवला जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद यांच्या नावावर आहे. पण, कोहलीला तो विक्रम मोडण्याची संधी आहे. शिवाय 78 धावांची खेळी करून त्याला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही मागे टाकण्याची संधी आहे. 

भारत-विंडीज वन डे मालिका आजपासून, जाणून घ्या सामने कधी व कोठे!

मियाँदादने 64 सामन्यांत 33.85च्या सरासरीनं 1930 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीनं 33 डावांत 70.81च्या सरासरीनं 1912 धावा केल्या आहेत. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक 7 शतकं आणि 10 अर्धशतकं ठोकली आहेत. मियाँदादचा हा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला केवळ 19 धावा कराव्या लागणार आहेत. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ ( 1708), दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस ( 1666) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानचा रमीज राजा ( 1624) पाचव्या स्थानी आहे. भारतीयांमध्ये महान फलंदाज सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानी आहे. तेंडुलकरने 39 डावांत 1573 धावा केल्या आहेत, तर राहुल द्रविडच्या नावावर 38 डावांत 1348 धावा आहेत.

बीसीसीआयचं चॅलेंज; शिखर धवन, श्रेयस अय्यरची 'बोबडी वळली'!

वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. त्यानं विंडीजविरुद्ध 7 शतकं केली आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे हाशीम आमला, एबी डिव्हिलियर्स आणि हर्शल गिब्स ( प्रत्येकी 5) यांचा क्रमांक येतो. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत गांगुलीचा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला 78 धावांची गरज आहे. गांगुलीनं 311 सामन्यांत 11363 धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत तो आठव्या स्थानी आहे.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीसौरभ गांगुलीजावेद मियादाद