गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना रद्द झाला. पण सामना रद्द झाला असला तरी वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेने मात्र इतिहास रचला आहे. नेमके गेलने या सामन्यात केले तरी काय, ते जाणून घ्या...
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्यात 13 षटकांचा खेळ झाला.पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द करावा लागला. गेलला या सामन्यात फक्त तीन धावा करता आल्या. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने गेलला क्लीन बोल्ड केले. गेलला या सामन्यात फक्त तीनच धावा करता आल्या. पण तीन धावा करूनही गेलने रेकॉर्ड रचला आहे.
भरताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गेल खेळला आणि वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक लढती खेळण्याचा विक्रम आता गेलच्या नावावर झाला आहे. भारताविरुद्धचा गेलचा हा 296 वा एकदिवसीय सामना होता. गेलने यावेळी वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला आहे. लाराच्या नावावर 295 एकदिवसीय सामने आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा सामना आता रविवारी 11 ऑगस्टला होणार आहे.
वन डेसाठी भारतीय संघ - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी वन डेसाठी वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर ( कर्णधार) केमार रोच.वन डे मालिका8 ऑगस्ट, पहिला सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, सायंकाळी 7 वा. पासून11 ऑगस्ट, दुसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून14 ऑगस्ट, तिसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून