भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील दमदार कामगिरीनंतर टीम इंडिया वन डे मालिकेतही वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारताला त्यांच्याच घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजनं कडवी टक्कर दिल्याचा इतिहास आहे. आतापर्यंत उभय संघांत भारतात झालेल्या 55 सामन्यांत यजमान आणि विंडीज यांनी प्रत्येकी 27 सामने जिंकले आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे वन डे मालिकेत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
वन डे मालिकेपूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. शिखर धवन पाठोपाठ भुवनेश्वर कुमारही जायबंदी झाला आहे आणि त्यामुळे संघाची गोलंदाजी बाजू कमकुवत झाली आहे. शिखर धवनच्या जागी संघात मयांक अग्रवालचा, तर भुवनेश्वरच्या जागी शार्दूल ठाकूरचा समावेश करण्यात आला आहे.
जाणून घेऊया या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक
- सामन्याची वेळ - दुपारी 1.30 वाजल्यापासून
- थेट प्रक्षेपण- स्टार स्पोर्ट्स वाहिनी, हॉटस्टार
उभय संघ
- भारत - विराट कोहली, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मयांक अग्रवाल, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल
- वेस्ट इंडिज - सुनील अॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर.