मुंबई: भारताचा संघ वेस्ट इंडीज दौर्यासाठी मुंबईहून सोमवारी रवाना झाला. यावेळी कर्णधार विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाचीच चर्चा रंगू लागली.
विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये कोहलीसह मनीष पांडे, केएल राहुल, कृणाल पांड्या, खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू आहेत. परंतू रोहित शर्मा या फोटोमध्ये नसल्याने नेटकऱ्यांनी रोहित कुठे आहे असे प्रश्न उपस्थित केले.
तसेच रोहितने देखील मुंबईचा क्रिकेटपटू श्रेयर अय्यरसोबतचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला असून या फोटोत ते दोघेच दिसत आहे.
वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्याआधी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने सर्व आरोप फेटाळून लावले.
या सर्व चर्चांवर कोहली म्हणाला की,'' मी पण खूप काही ऐकले आहे. पण, संघात तसं काहीच नाही. जर ड्रेसिंग रुमचे वातावरणं चांगले नसते तर मागील दोन वर्षांत संघाची कामगिरीचा आलेख चढा राहिला नसता. त्यामुळे संघात वाद नाही. ऑल इज वेल... अशा चर्चा येणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा चर्चा होणे दुर्दैवी असल्याचे त्याने स्पष्ट केले.