फ्लोरिडा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : यजमान विंडीज संघ तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 0-2 अशा पिछाडीवर पडला आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन्ही डावांत निर्विवाद वर्चस्व गाजवताना बाजी मारली. दुसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघ डकवर्थ लुईसनुसार 22 धावांनी विजयी ठरला. या सामन्या गैरवर्तन करणाऱ्या विंडीजच्या किरॉन पोलार्डला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं चांगलंच फटकारलं आहे. पंचांनी वारंवार दिलेल्या सूचनांचं त्यानं उल्लंघन केले, त्यामुळे त्याला आयसीसीनं दंड सुनावला. पोलार्ड आयसीसीच्या 2.4 कलमांतर्गत दोषी आढळला आहे.
ट्वेंटी-20त सर्वाधिक धावांचा विक्रम कॅप्टन कोहलीच्या नावावर; कोण होतं टॉप?तिसऱ्या सामन्यात दिग्गजांना विश्रांती मिळणार, टीम इंडियात नवे चेहरे दिसणार!
सामना सुरू असताना पोलार्डनं बदली खेळाडूची मागणी केली होती. पण, पंचांनी त्याला षटक संपल्यानंतर बदली खेळाडू बोलाव, अशी सूचना केली होती. मात्र, पोलार्डनं या सूचनेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलार्डनं मात्र हे आरोप अमान्य केले आहेत. त्याला आयसीसीनं सामन्यातील मानधनाची 20 टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितले आहे.
दुसरा ट्वेंटी-20 सामन्यात भारताच्या 5 बाद 167 धावांचा पाठलाग करताना विंडीजनं 15.3 षटकांत 4 बाद 98 धावा केल्या होत्या. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे पुढील खेळ झालाच नाही आणि भारताने डकवर्थ लुईसनुसार 22 धावांनी विजय निश्चित केला. या विजयासह भारताने तीन ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात रोहित शर्मानं ( 67) अर्धशतकी खेळी करत अनेक विक्रम मोडले, तर कृणाला पांड्यानं 23 धावांत 2 विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
भारताच्या नवदीप सैनीवर आयसीसीची कारवाई, पण का?भारताचा युवा गोलंदाज नवदीन सैनीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) कारवाई केली आहे. सैनीनं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सैनीनं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 17 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यापैकी दोन विकेट या पदार्पणाच्या पहिल्याच षटकात त्यानं टिपल्या. पण, त्या सामन्यात त्यानं आयसीसीच्या 2.5 या नियमाचे उल्लंघन केले. त्यानं विंडीज फलंदाजाला बाद केल्यानंतर आक्रमकपणे त्याला डिवचले. त्यामुळे आयसीसीनं त्याला एक डिमेरीट्स पॉईंट्स दिले. डावाच्या चौथ्या षटकात ही प्रसंग घडला. सैनीनं विंडीजच्या निकोलस पुरनला बाद केले आणि त्यानंतर त्याचा डिवचले. सैनीनं आपली चूक मान्य केली आहे.