Join us  

India vs West Indies: विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यात पुन्हा चढाओढ; पाहा कुणाची बाजू वरचढ

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांतीवर गेलेला कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या सामन्यात मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 12:34 PM

Open in App

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांतीवर गेलेला कर्णधार विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध पुन्हा एकदा मर्यादित षटकांच्या सामन्यात मैदानावर उतरणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातली ट्वेंटी-20 मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा विराट आणि रोहित शर्मा यांच्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत टीम इंडियानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेत रोहितनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहलीला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलं. रोहितनं 101 सामन्यांत 2539 धावा केल्या आहेत. कोहली 72 सामन्यांत 2450 धावा केल्या आहेत. विराटला अव्वल स्थानावर पुन्हा कब्जा करण्यासाठी 89 धावांची गरज आहे. ट्वेंटी-20त कोहलीची सरासरी ही 50 इतकी आहे, तर रोहितनं 32.13च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.

ट्वेंटी-20 त सर्वाधिक धावा  रोहित शर्मा - 2539 धावा ( 93 डाव)विराट कोहली - 2450 धावा ( 67 डाव)मार्टिन गुप्तील - 2436 धावा ( 80 डाव) 

ट्वेंटी-20 सर्वाधिक धावांच्या शर्यतीबरोबरच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या विक्रमातही या दोघांमध्ये शर्यत आहे. रोहित आणि विराट यांनी 22 वेळा 50+ धावा केल्या आहेत. रोहितनं 4 शतकं व 18 अर्धशतकं झळकावली आहेत, तर कोहलीच्या नावावर एकही शतक नाही.  

सर्वाधिक 50+ धावारोहित शर्मा - 22 ( 4/100, 18/50)विराट कोहली - 22 ( 0/100, 22/50)मार्टिन गुप्तील - 17 ( 2/100, 15/50) 

  • भारतीय संघ ट्वेंटी-20 - विराट कोहली, युजवेंद्र चहल, दीपक चहर, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर.
  • वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अ‍ॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स, 

विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁    ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁    वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहली