ठळक मुद्देपाहा खास व्हिडीओ...
भारतीय संघात नेमके कधी आणि काय बदल होतील, हे सांगता येत नाही. कारण सराव करताना चित्र आणि संघ निवड यामध्ये बराच फरक असल्याचे पाहायला मिळते. भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तर एका खेळाडूचे मैदानात बरपूर लाड केल्याचे पाहायला मिळाले. पण त्याला संघात मात्र स्थान दिले नाही.
भारतीय संघ व्यवस्थापन रिषभ पंतला भरपूर संधी देत आहे. तो चांगल्या फॉर्मात नसला तरी त्याला स्थान दिले जाते. पण दुसरीकडे युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला मात्र अजून एकही सामना खेळवला नाही. संजूला तर एकही सामना न खेळवता गेल्यावेली संघातून बाहेर काढण्यात आले होते. पण सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे संजूला यावेळी संघात स्थान मिळाले. पण अजूनही त्याला संधी मिळालेली नाही.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा सामना रविवारी तिरुअनंतपुरम येथे खेळवण्यात आला होता. संजू हा इथला स्थानिक खेळाडू आहे. त्यामुळे या सामन्यात तरी संजूला स्थान मिळेल, असे वाटले होते. पण या सामन्यातही संजूला स्थान देण्यात आले नाही. पण मैदानात मात्र शास्त्री संजूचे चांगलेच लाड ककरत असल्याचे समोर आले. आता नेमके घडले तरी काय, याचा विचार तुम्ही करत असाल...
संजू केरळचा स्थानिक खेळाडू आहे. त्यामुळे तो जेव्हा सरावासाठी मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांनी त्याच्या नावाने पुकारा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी रशी शास्त्रीही त्याच्या जवळ होते. सुरुवातीला त्यांनी मस्करीमध्ये त्याला फाईट मारण्याची अॅक्टींग केली. त्यानंतर त्याला मिठी मारत त्याचे लाड केल्याचे पाहायला मिळाले.
विराट कोहलीने त्या सुपर कॅचबद्दल केला मोठा खुलासा...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत विराट कोहलीनं 'सुपरकॅच' घेतल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमारचा अफलातून झेल घेतला आणि साऱ्यांनाच धक्का बसला. कारण हा झेल कोणी पकडेल असे, वाटले नव्हते. पण कोहलीने हा झेल पकडला. या झेलनंतर सर्वांनीच कोहलीचे कौतुक केले. पण या झेलबाबत कोहलीने मोठा खुलासा केला आहे.
शिमरोन हेटमारयने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात चांगलीच फटकेबाजी केली. त्यानं रवींद्र जडेजाच्या एका षटकात सलग दोन षटकार खेचले, परंतु तिसरा षटकार खेचण्याच्या नादात तो झेल देऊन माघारी परतला. विराटनं सुपर डाईव्ह मारताना त्याचा अप्रतिम झेल टिपला. हेटमायर 14 चेंडूंत 3 षटकारांसह 23 धावा करून माघारी परतला. भारताला हा सामना गमवावा लागला.
सामना संपल्यावर कोहलीला या झेलबाबत विचारण्यात आले. त्यावेळी कोहली म्हणाला की, " जेव्हा चेंडू हातामध्ये फसतो तेव्हा असे झेल घेतले जातात. मी चेंडूला बघत होतो. जेव्हा चेंडू जवळ आला तेव्हा मी हात पुढे केले. माझं नशिब बलवत्तर होतं, त्यामुळे मला हा झेल पकडता आला."
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शिवम दुबेनं पहिलं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील अर्धशतक झळकावताना आजचा दिवस गाजवला आणि त्यामुळे भारताला समाधानकारक पल्ला गाठता आला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा योग्य अंदाज बांधताना भारताच्या धावगतीवर वेसण घातले. विंडीजच्या केस्रीक विलियम्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताने 20 षटकांत 7 बाद 170 धावांपर्यंत मजल मारली. शिवमने 30 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा चोपल्या.
लेंडल सिमन्स आणि एव्हिन लुइस यांनी संयमी खेळ केला. त्यांना नशीबाचीही साथ लाभली. पाचव्या षटकात सिमन्सचा झेल वॉशिंग्टन सुंदरनं सोडला. भुवनेश्वर कुमारच्या त्याच षटकात लुइसचा झेल रिषभ पंतकडून सुटला. हा झेल थोडासा अवघड होता, परंतु रिषभनं पुरेपूर प्रयत्न केले. विंडीजनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 41 धावा केल्या. त्यानंतर दोघांनी फटकेबाजी केली. वॉशिंग्टन सुंदरच्या अखेरच्या षटकात भारताला यश मिळालं. 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिषभ पंतनं विंडीजच्या लुइसला यष्टिचीत केले. लुइस 35 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 40 धावांत तंबूत परतला.
Web Title: India vs West Indies: Ravi Shastri happy with 'this' player on the field; But not a given place in the team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.