अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात दमदार कामगिरी केली आहे. ट्वेंटी-20, वन डे मालिकांपाठोपाठ टीम इंडिया कसोटी मालिका खिशात घालण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बदलेल अशी चर्चा होती, परंतु क्रिकेट सल्लागार समितीनं पुन्हा एकदा शास्त्रींनाच संधी दिली. त्यामुळे शास्त्रींचा आनंद आणखी द्विगुणीत झाला. त्यात टीम इंडियाही त्यांना विजयाची भेट देत आहे. अँटिग्वा कसोटी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये आहेत आणि अशात शास्त्री रिलॅक्स नसतील, असे होणार नाही. त्यांनी मंगळावीर रिलॅक्स मूडवाला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि नेटिझन्सना ट्रोल करण्यासाठी आयतं कोलीतच सापडलं.
न्यूझीलंडनं विराट कोहलीचं टेंशन वाढवलं; असं काय आहे कारण?
अजिंक्य रहाणेने झळकावलेले दहावे शतक व हनुमा विहारीच्या 93 धावांनंतर जसप्रीत बुमराहने अवघ्या 7 धावांत घेतलेल्या 5 बळींमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 318 धावांनी धुव्वा उडविला. रविवारी, चौथ्या दिवशी विजयासाठी 419 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान दुसऱ्या डावात 100 धावांवर गारद झाला. यासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतानाच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी देताना गुणांचे खातेही उघडले.
अन् अजिंक्य रहाणेनं 'त्यांना' समर्पित केलं शतक
त्यानंतर मंगळवारी शास्त्रींनी इंस्टाग्राम व ट्विटरवर त्यांचा एक फोटो शेअर केला. त्यात शास्त्रींनी ज्युस पिण्याची वेळ आली आहे, असे लिहिलं. त्यानंतर नेटिझन्सनी धुमाकूळ घातला.
पाहा नेटिझन्सनी काय केलं...
कॅप्टन विराट कोहलीचे शतक; असा विक्रम करणारा तिसरा भारतीय
कॅप्टन कोहलीचा बोलबाला, टीम इंडियानं नोंदवला सर्वात मोठा विजय
कोहली ठरला 'दादा' कर्णधार; गांगुलीला मागे टाकलं अन् धोनीशी केली बरोबरी
बूम बूम बुमराह; भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम, कोणलाही जमला नाही असा पराक्रम