India vs West Indies: वन डे पदार्पणासाठी रिषभ पंत सज्ज, धोनीचे स्थान धोक्यात?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी 12 सदस्यीय संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 01:28 PM2018-10-20T13:28:49+5:302018-10-20T13:29:16+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies: Rishabh Pant set for debutant ODI, Dhoni's place in danger? | India vs West Indies: वन डे पदार्पणासाठी रिषभ पंत सज्ज, धोनीचे स्थान धोक्यात?

India vs West Indies: वन डे पदार्पणासाठी रिषभ पंत सज्ज, धोनीचे स्थान धोक्यात?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे केदार जाधव आणि हार्दिक पांड्या यांना दुखापतीमुळे संघाबाहेरच ठेवण्यात आले आहे

गुवाहाटी : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी 12 सदस्यीय संघ जाहीर केला. या संघात रिषभ पंतला स्थान देण्यात आल्यामुळे रविवारी गुवाहाटी येथे होणाऱ्या वन डे सामन्यात तो पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेतील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने वन डे संघात स्थान पटकावले. पंतच्या समावेशामुळे अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीचे स्थान धोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
 



2019 ची विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता भारतीय संघात प्रयोग केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून पंतला संधी देण्यात आली आहे. अर्थात विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीच पहिली पसंती असेल, यात वाद नाही. मात्र, धोनीचा सध्याचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. केदार जाधव आणि हार्दिक पांड्या यांना दुखापतीमुळे संघाबाहेरच ठेवण्यात आले आहे. अंबाती रायुडूने आपले स्थान कायम राखले आहे. कसोटी मालिकेत अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला डच्चू देण्यात आला आहे.  

भारतीय संघः विराट कोहली ( कर्णधार ), शिखर धवन, रोहित शर्मा, अंबाती रायुडु, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, उमेश यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद. 

 

Web Title: India vs West Indies: Rishabh Pant set for debutant ODI, Dhoni's place in danger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.