भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेत पुन्हा एकदा रिषभ पंतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले असणार. पंत गेला बराच काळ फॉर्माशी झगडत आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पंतला सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. तेथेही त्याला फार समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात असलेल्या पंतला विंडीज मालिकेत स्वतःला सिद्ध करावे लागेल. दरम्यान, या मालिकेत त्याला कॅप्टन कूल धोनीचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे.
मर्यादित षटकांच्या सामन्यांत धोनीला सक्षम पर्याय म्हणून पंतचं नाव आघाडीवर करण्यात येत आहे. पण, त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विंडीजविरुद्धच्या मालिकेत त्याच्यावर दडपण असणार आहे. या मालिकेत पंतला फलंदाजीतच नव्हे तर यष्टिंमागेही आपली छाप पाडावी लागेल. या मालिकेत पंतनं तीन फलंदाज बाद करताच धोनीचा विक्रम मोडला जाणार आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये धोनी आघाडीवर आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ट्वेंटी-20 मालिकेतील यष्टिरक्षकांची कामगिरी महेंद्रसिंग धोनीः 7 सामन्यांत 5 बळी ( 3 - झेल व 2 स्टम्पिंग)दीनेश रामदिनः 7 सामन्यांत 5 बळी ( 5- झेल)आंद्रे फ्लेचरः 4 सामन्यांत 3 बळी ( 3- झेल)दीनेश कार्तिकः 4 सामन्यांत 3 बळी ( 3 - झेल)रिषभ पंतः 7 सामन्यांत 3 बळी ( 3 - झेल)
- भारतीय संघ ट्वेंटी-20 - विराट कोहली, युजवेंद्र चहल, दीपक चहर, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल, संजू सॅमसन, रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर.
- वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स.
विंडीज मालिकेचे वेळापत्रक⦁ ट्वेंटी-20 मालिका6 डिसेंबर - हैदराबाद8 डिसेंबर - तिरुवनंतपुरम11 डिसेंबर - मुंबई ⦁ वन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक