फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झाला आहे. येथे टीम इंडिया तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. 3 ऑगस्टपासून ट्वेंटी-20 सामन्यानं या दौऱ्याची सुरुवात होईल. भारतीय संघाने ट्वेंटी-20 संघात राहुल चहर, नवदीप सैनी, दीपक चहर आणि श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. शिवाय या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार हे अनुभवी खेळाडू आहेत. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे विंडीज संघात किरॉन पोलार्ड आणि सुनील नरीन या अनुभवी खेळाडूंचा पुनरागमन होत आहे. शिवाय जॉन कॅम्बेल व अँथोन ब्रॅम्बले या युवा खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवूनच दोन्ही संघांनी युवा खेळाडूंना संधी दिली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्माचाच वरचष्मा असल्याचे दिसत आहे. चला तर मग दोन्ही संघांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया.
- निकाल - वेस्ट इंडिज - 11 विजय; भारत - 11 विजय; अनिर्णीत - 1
- सर्वोत्तम धावसंख्या - 6 बाद 245 धावा, वेस्ट इंडिज 2016
- निचांक धावसंख्या - 8 बाद 109 धावा, वेस्ट इंडिज, 2018
- सर्वाधिक धावा - रोहित शर्मा ( 334), एव्हिन लुईस ( 232), विराट कोहली ( 212)
- सर्वोत्तम धावा - एव्हिन लुईस ( 125*, 2017), रोहित शर्मा ( 111*, 2018)
- सर्वाधिक शतक - एव्हिन लुईस ( 2), रोहित शर्मा/लोकेश राहुल ( 1)
- सर्वाधिक अर्धशतक - रोहित शर्मा ( 3), जॉन्सन चार्ले/एव्हिन लुईस/विराट कोहली ( 2)
- सर्वाधिक विकेट - जसप्रीत बुमराह ( 8)
- ट्वेंटी-20 मालिका
3 ऑगस्ट, पहिला सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून 4 ऑगस्ट, दुसरा सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून6 ऑगस्ट, तिसरा सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, रात्री 8 वा. पासून
- वन डे मालिका
8 ऑगस्ट, पहिला सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, सायंकाळी 7 वा. पासून11 ऑगस्ट, दुसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून14 ऑगस्ट, तिसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून
- कसोटी मालिका
22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून