फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माची दे दणादण फलंदाजी पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत रोहितने भाराताल आक्रमक सुरुवात करून दिली. रोहितच्या या दमदार सुरुवातीमुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना 167 धावा करता आल्या.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांनी यावेळी ६७ धावांची सलामी करून दिली. धवन यावेळी २३ धावांवर बाद झाला. धवन बाद झाल्यावरही रोहितने आपली धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवली. रोहितने ५१ चेंडूंत ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६७ धावांची खेळी साकारली.
रोहित बाद झाल्यावर विराट कोहलीने भारताचा किल्ला लढवला, पण कोहलीला मोठी खेळी साकारता आली नाही. कोहलीला २८ धावा करता आल्या. कृणाल पंड्याने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला आपली धावसंख्या फुगवता आली.