India vs West Indies: वन डे मालिकेतून भुवनेश्वरची माघार; दुखापतीनं पुन्हा डोकं काढलं वर

भुवनेश्वरला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दुखापतीनं पुन्हा ग्रासलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 11:44 AM2019-12-14T11:44:56+5:302019-12-14T11:45:43+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies : Shardul Thakur to replace Bhuvneshwar Kumar in Team India squad for the ODI series against West Indies  | India vs West Indies: वन डे मालिकेतून भुवनेश्वरची माघार; दुखापतीनं पुन्हा डोकं काढलं वर

India vs West Indies: वन डे मालिकेतून भुवनेश्वरची माघार; दुखापतीनं पुन्हा डोकं काढलं वर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवननं दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्याच्या जागी मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला. त्यात भर म्हणून गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही वन डे मालिकेतून माघार घेतली आहे. भुवनेश्वरला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दुखापतीनं पुन्हा ग्रासलं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) शुक्रवारी अधिकृत घोषणा केली. 


वानखेडेवर झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भुवीच्या दुखापतीनं पुन्हा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळालं. चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर भुवीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले होते, परंतु त्याची दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झाली नसल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबत अजून कोणताच धोका पत्करायचा नसल्यानं त्याला आगामी वन डे मालिकेत विश्रांती दिली जाऊ शकते. मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार तिसऱ्या व अंतिम ट्वेंटी-20 सामन्यात भुवनेश्वरला वैद्यकिय मदत घ्यावी लागली होती. भारतानं हा सामना 67 धावांनी जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली.  त्याची ही दुखापत किती गंभीर आहे, हे पाहीले जाईल. भुवीच्या जागी मुंबईचा गोलंदाज शार्दूल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला आहे.

भारताय संघ वन डे - विराट कोहली, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मयांक अग्रवाल, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुल

वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अ‍ॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर. 
 

विंडीज मालिकेचे वेळापत्रक
वन डे मालिका
15 डिसेंबर- चेन्नई
18 डिसेंबर- विशाखापट्टणम
22 डिसेंबर - कट्टक
 

Web Title: India vs West Indies : Shardul Thakur to replace Bhuvneshwar Kumar in Team India squad for the ODI series against West Indies 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.