भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवननं दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्याच्या जागी मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला. त्यात भर म्हणून आणखी एका खेळाडूला वन डे मालिकेला आता मुकावे लागण्याची शक्यता आहे. संघातील प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारला तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात दुखापतीनं पुन्हा ग्रासलं. त्यामुळे तो आता वन डे मालिकेतून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. पण, भुवीच्या जागी मुंबईच्या गोलंदाजाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भुवीच्या जागी मुंबईचा गोलंदाज शार्दूल ठाकूरचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात शार्दूलनं फलंदाजी व गोलंदाजी दोन्ही विभागात साजेशी कामगिरी करून दाखवली आहे,
भारताय संघ वन डे - विराट कोहली, रोहित शर्मा, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मयांक अग्रवाल, शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार/??, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, लोकेश राहुलवेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर.
विंडीज मालिकेचे वेळापत्रकवन डे मालिका15 डिसेंबर- चेन्नई18 डिसेंबर- विशाखापट्टणम22 डिसेंबर - कट्टक