फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिजः वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी दाखल झाला आहे. येथे टीम इंडिया तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. शनिवारपासून ट्वेंटी-20 सामन्यानं या दौऱ्याची सुरुवात होईल. भारतीय संघाने ट्वेंटी-20 संघात राहुल चहर, नवदीप सैनी, दीपक चहर आणि श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. शिवाय या संघात विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार हे अनुभवी खेळाडू आहेत. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या दौऱ्यात नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, याची शक्यता अधिक आहे आणि त्याचे संकेत कॅप्टन कोहलीनं शुक्रवारी दिले. पण, त्याच्या याच संकेतातून रोहितच्या खेळण्यावर संभ्रम निर्माण केला आहे.
India Vs West India : टीम इंडिया मियामीत दाखल, विराट-अनुष्काचे फोटो व्हायरल!
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कोहली-रोहित वादाच्या चर्चा रंगल्या. पण, विंडीज दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कोहलीनं या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. मात्र, विंडीज दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर कोहलीनं सहकाऱ्यांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यात रोहित न दिसल्यानं चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याला खतपाणी घालणारा आणखी एक फोटो कोहलीनं शुक्रवारी पोस्ट केला. विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी कोहलीनं पोस्ट केलेल्या या फोटोत रोहितची अनुपस्थिती दिसल्यानं चाहते पुन्हा चकित झाले. त्यामुळे रोहित उद्याचा सामना खेळणार की नाही, असाही प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला.
विंडीजविरुद्ध हिटमॅन रोहितचाच वरचष्मा, कॅप्टन कोहलीला गाठावा लागेल मोठा पल्ला
भारताच्या विंडीज दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक, एका क्लिकवर!
दरम्यान, रोहितन या वादावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, त्यानं गुरुवारी एक फोटो पोस्ट करून स्पष्ट संकेत दिले. त्यात लिहिले की, मी केवळ संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो. त्यानंतर कोहलीनं आज 'संघ' अशा मथळ्याखाली पोस्ट केलेल्या फोटोतून रोहित गायब असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
कोहलीनं नेमकं काय ट्विट केलं?
कोहलीच्या ट्विटवर चाहत्यांचे सवाल...
Web Title: India Vs West Indies : Squad without Hitman? Fans question Rohit Sharma's absence from Virat Kohli's team pictures
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.