India vs West Indies T20I Series : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी झालेल्या लिलावात २०४ खेळाडूंवर ५५१ कोटी ७० लाख रुपयांची उधळण झाली. यावेळेत सर्व फ्रँचायझींनी भविष्याचा विचार करून भारतीय खेळाडूंवरच अधिक भर दिला. त्यामुळे इशान किशन, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, शाहरुख खान, आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर आदी भारतीय खेळाडू मालामाल झाले. आता या खेळाडूंचे सर्व लक्ष १६ तारखेपासून सुरू होणाऱ्या India vs West Indies T20I series कडे लागले आहे. पण, या मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. IPL 2022 Auction मध्ये सनरायझर्स हैदराबादने ( Sunrisers Hyderabad) ८.७५ कोटी मोजलेल्या खेळाडूने ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे.
बीसीसीआयनं ट्वेंटी-२० मालिकेतून लोकेश राहुल व अष्टपैलू अक्षर पटेल यांनी माघार घेतल्याचे आधीच जाहीर केले होते. लोकेश राहुलच्या डाव्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते आणि त्यामुळेच त्याने तिसऱ्या वन डेतून माघार घेतली. अक्षर पटेलला मालिका सुरू होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती आणि तो आता त्यातून सावरण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. आता ही दोघं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होतील. या दोघांच्या अनुपस्थितीत निवड समितीने ऋतुराज गायकवाड व दीपक हुडा यांची ट्वेंटी-२० संघात निवड केली आहे.
भारताने वन डे मालिकेत ३-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ट्वेंटी-२० मालिका गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. अशात रोहितचा खास माणूस अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sundar ) याने मांडीचे स्नायू ताणल्या गेल्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. रवींद्र जडेजा आधीच बाहेर असताना वॉशिंग्टनची माघार हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याच्या जागी कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे.
भारताचा ट्वेंटी-२० संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा ( India’s T20I squad: Rohit Sharma (Captain), Ishan Kishan, Virat Kohli, Shreyas Iyer, Surya Kumar Yadav, Rishabh Pant (wicket-keeper), Venkatesh Iyer, Deepak Chahar, Shardul Thakur, Ravi Bishnoi, Yuzvendra Chahal, Mohd. Siraj, Bhuvneshwar Kumar, Avesh Khan, Harshal Patel, Ruturaj Gaikwad, Deepak Hooda )
Web Title: India vs West Indies T20I Series : Washington Sundar ruled out of the T20 series against West Indies, he goes to Sunrisers Hyderabad for Rs 8.75 crore in IPL auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.