जमैका, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताविरुद्धच्यातीन दिवसीय सराव सामन्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं 14 सदस्यीय वेस्ट इंडिज अ संघ जाहीर केला. वेस्ट इंडिजनं जाहीर केलेल्या 14 सदस्यीय संघात डॅरेन ब्राव्हो आणि जॉन कॅम्प्बेल यांना संधी देण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या सराव सामन्यात टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याची शक्यता आहे. तिसऱ्या वन डे सामन्यात त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.
ब्राव्हो आणि कॅम्प्बेल हे कसोटी संघाचेही सदस्य आहेत. अँटिग्वा येथे 22 ऑगस्टपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत या कसोटी मालिकेचा समावेश असल्याचे चुरस पाहायला मिळेल. या संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक जॅहमर हॅमिल्टन करणार आहे.
दुखापतीमुळे कोहलीला मिळणार विश्रांती, अजिंक्य रहाणे करणार टीम इंडियाचे नेतृत्व
ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेसाठी सज्ज होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियात कमबॅक करणार आहेत. या मालिकेपूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडिज बोर्ड एकादश संघाविरुद्ध तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्याला सुरुवात होणार असून यात कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार आहे.
कसोटीसाठी भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव
कसोटी मालिका22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून