पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरूद्ध वेस्ट इंडिज : भारताचा संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून दमदार कामगिरी करत आहे. पण भारतीय संघाच्या व्यवस्थापकांना मात्र वेस्ट इंडिजमध्ये बिनशर्त माफी मागण्याची वेळ आली आहे. कारण भारताच्या व्यवस्थापकांकडून या दौऱ्यात मोठी चूक झाली होती. त्यामुळे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम या दौरा अर्धवट सोडून भारतात पाठवण्याची तयारी सुरु होती. पण सुनील यांनी बिनशर्त माफी मागितली आणि त्यानंतर बीसीसीआयने त्यांना दौऱ्यावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे प्रकरणभारतीय दुतावासातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भारतीय संघातील सदस्याला दूरध्वनी केला होता. या दूरधवनीचे उत्तर या सदस्याने दिले नाही. त्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनीही त्याला दूरध्वनी केला, पण त्यालाही कोणतेच उत्तर या सदस्याने दिले नाही. त्यामुळे या सदस्याला थेट भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता भारतीय संघातील कोणत्या सदस्याला दौरा अर्धवट सोडून मायदेशी धाडण्यात आले आणि याचा संघावर कोणता परीणाम होईल, याची उत्सुकता आता तुम्हाला असेल. भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आता सुनील यांचे संघाचे व्यवस्थापक पदही जाणार असल्याचे म्हटले जात आहे. आता बीसीसीआय त्यांच्यावर कोणती कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीलेले आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, " वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर सध्या भारतीय संघ आहे. या दौऱ्यादरम्यान भारतीय संघ 'जल संरक्षण' या योजनेअंतर्गत शुटींग करत आहे. पण हे शुटींग सुरु असतानाच वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मंडळाने एक मेल केला आहे. या इ-मेलनुसार भारतीय संघातील सदस्याला थेट भारतात धाडण्यात आले आहे. यादरम्यान भारतीय संघातील सदस्याने वरीष्ठ सरकारी अधिकारी आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांबरोबर गैरवर्तन केले आणि त्यामुळेच त्याला थेट भारतात पाठवण्यात आले."