Join us  

India vs West Indies : विराटने केली सचिन आणि सिद्धूच्या विक्रमाची बरोबरी

विश्वचषकात सलग चार सामन्यात ५० पेक्षा जास्त धावांचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 8:35 PM

Open in App

आकाश नेवे : भारतीय कर्णधार विराट कोहली याने आज वेस्ट इंडिज् विरोधात खेळताना शानदार अर्धशतक झळकावले. त्यासोबत विराटने सचिन तेंडुलकर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या एका कामगिरीची बरोबरी केली आहे. विश्वचषक स्पर्धेत सलग चारसामन्यात भारताकडून सलग ५० पेक्षा जास्त धावा त्याने केल्या. सचिन याने २००३ आणि १९९६ च्या विश्वचषकात ही कामगिरी केली होती. तर नवज्योत सिंग सिद्धू याने १९८७ च्या विश्वचषकात ही कामगिरी केली होती. त्याची बरोबरी विराटने आज केली. भारताकडून अशी कामगिरी करणारे हे तिघेच आहेत.

विराट कोहली - २०१९ विश्वचषकधावा विरोधी संघ७२ वि. वेस्ट इंडिज्६७ वि. अफगाणिस्तान७७ वि. पाकिस्तान८२ वि. ऑस्ट्रेलिया

सचिन तेंडुलकर२००३ विश्वचषक८१ वि. झिम्बाब्वे१५२ वि. नामिबिया५० वि.इंग्लंड९८ वि. पाकिस्तान१९९६ विश्वचषक१२७ वि. केनिया७० वि. वेस्ट इंडिज१३७ वि. श्रीलंका

नवज्योत सिंग सिद्धू७३ वि. ऑस्ट्रेलिया७५ वि. न्युझिलंड५१ वि. ऑस्ट्रेलिया५५ वि. झिम्बाब्वे

 

 वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार निराट कोहली शतक झळकावेल, असे वाटत होते. पण कोहलीला यावेळी ७२ धावांवर समाधान मानावे लागले. पण या अर्धशतकासह कोहलीने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा २७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

कोहलीचे या विश्वचषकातील हे सलग चौथे अर्धशतक ठरले. या खेळीसह कोहली भारताचा सलग चार अर्धशतके लगावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अझरच्या नावावर होता. अझरने १९९२ साली झालेल्या विश्वचषकात सलग तीन अर्धशतके लगावली होती. आता हा विक्रम कोहलीच्या नावावर असेल.

विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा या दिग्गजांना सोडले मागेभारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना मागे टाकले आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अर्धशतक झळकावले. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. कारण बाद झालेल्या भारताच्या तिन्ही फलंदाजांना अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे या अर्धशतकाबरोबर कोहलीने नवा विश्वविक्रम रचला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर ( 34357) आणि राहुल द्रविड ( 24208) यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीच्या नावावर वन डेत 11020, कसोटीत 6613 आणि ट्वेंटी-20 2263 धावा आहेत. 

तेंडुलकर आणि लारा यांनी सर्वात कमी म्हणजे 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 415 डाव ( 131 कसोटी, 222 वन डे आणि 62 ट्वेंटी-20) फलंदाजी केली आहे. त्यात त्याच्या नावावर 19896 धावा होत्या. तेंडुलकर आणि लारा यांच्यानंतर या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंगचा ( 468) नंबर येतो. पण आता कोहली या यादीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे, कारण २० हजार आंतरराष्ट्रीय धावा ४१६ सामन्यांमध्ये पूर्ण केल्या आहेत.

टॅग्स :विराट कोहलीसचिन तेंडुलकरनवज्योतसिंग सिद्धूवर्ल्ड कप 2019