राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गुरुवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. राजकोट येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघात नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. सलामीसाठी लोकेश राहुल, मयांक अग्रवाल आणि पृथ्वा शॉ यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. या संघात युवा खेळाडूंचा भरणा असल्याने कर्णधार कोहलीने त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला,'' हनुमा विहारी, पृथ्वी शॉ किंवा मयांक अग्रवाल यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे त्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळाले आहे. त्यांनी याकडे संधी म्हणून पाहावे. त्याचे दडपण घेता कामा नये. संघात स्थान तयार करण्याची त्यांच्यासाठी हिच योग्य संघी आहे. "
"या मालिकेत सलामीला नवी जोडी खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांना त्यांच्यातील कौशल्य दाखवण्याची संधी आहे," असेही विराटने सांगितले.
Web Title: India vs West Indies: Virat Kohli gave important advice to youngsters
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.