भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना आज विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. वेस्ट इंडिजनं पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकावा लागणार आहे. टीम इंडियाला या सामन्यात गोलंदाजी संयोजनात सुधारणा करावी लागणार आहे. याही सामन्यात नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूनं लागला. कर्णधार किरॉन पोलार्डनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा प्रथम फलंदाजी करणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं इतिहास रचला.
विशाखापट्टणमची खेळपट्टी ही विराटसाठी नेहमी खास राहिली आहे. येथे खेळलेल्या पाच सामन्यांत कोहलीनं अनुक्रमे 118, 117, 99, 65 आणि नाबाद 157 धावा चोपल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्याकडून तुफानी खेळीची अपेक्षा आहे. आजचा हा सामना हा कोहलीचा 400वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. हा पल्ला गाठणारा तो आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. या विक्रमात महान फलंदाज सचिन तेंडुलकर 664 सामन्यांसह आघाडीवर आहे. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ( 538), राहुल द्रविड ( 509), मोहम्मद अझरुद्दीन ( 433), सौरव गांगुली ( 424), अनील कुंबळे ( 403), युवराज सिंग ( 402) यांनी चारशे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
भारत - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव