भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला 6 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. तीन ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियानं आपला संघ आधीच जाहीर केला. वेस्ट इंडिजनं शुक्रवारी सॉलिड संघ मैदानावर उतरवला. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळानं शुक्रवारी भारत दौऱ्यावर येणाऱ्या संघाची घोषणा केली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून वेस्ट इंडिजनं हा संघ जाहीर केला आहे. वन डे आणि ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी किरॉन पोलार्डच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पोलार्डसह ट्वेंटी-20 संघात शेरफन रुथरफोर्ड आमि जेसन होल्डर यांचाही समावेश करण्यात आला आहे.
Ind vs Wi: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वेळापत्रकात बदल, जाणून घ्या कोणता सामना कुठे
पाहुण्यांनी दमदार फलंदाजांची फौजच या मालिकेला पाठवली आहे. यात एव्हिन लुईस, शिमरोन हेटमायर, लेंडल सिमन्स, पोलार्ड आणि निकोलस पूरण यांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे शेल्डन कोट्रेल, होल्डर, किमो पॉल आणि केस्रीक विलियम्स यांचा समावेश आहे.
वेस्ट इंडिजचा वन डे संघः सुनील अॅब्रीस, शे होप, खॅरी पिएर, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, किरॉन पोलार्ड ( कर्णधार), शेल्डन कोट्रेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरण, शिम्रोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनियर.
वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-20 संघः फॅबियन अॅलेन, ब्रँडन किंग, डेनेस रामदिन, शेल्डन कोट्रेल, एव्हिन लुईस, शेरफान रुथरफोर्ड, शिमरोन हेटमायर, खॅरी पिएर, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, किरॉन पोलार्ड ( कर्णधार, हेडन वॉल्श ज्युनियर, किमो पॉल, निकोलस पूरण, केस्रीक विलियम्स,