Join us  

India Vs West Indies : रोहित सोबतच्या वादावर कॅप्टन कोहली आज काय बोलणार?

रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 1:03 PM

Open in App

मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारतीय संघ अमेरिकेला रवाना होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याआधी कोहली पत्रकारांशी संवाद साधणार नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, कर्णधार कोहली पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती, बीसीसीआयनं दिली.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. यानंतर या विषयावर विराट काय बोलणार तसेच पत्रकारांना या विषयावरची योग्य ती उत्तरे देणार कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वर्ल्ड कपनंतर विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. यात पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. यावर बीसीसीआयचे प्रमुख विनोद राय यांनी, विराट-रोहितमध्ये कोणताच वाद नसल्याते मत व्यक्त केले आहे. राय यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, "मीडियानं या बातम्या पसरवल्या आहेत. यात काहीच तथ्य नाही. भारतीय संघात कोणतीही गटबाजी नाही आहे", असे परखड मत व्यक्त केले होते.

आज सायंकाळी सात वाजता भारतीय संघ पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. त्याआधी सायंकाळी सहा वाजता विराट कोहली पत्रकारांशी संवाद साधणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतविराट कोहलीरोहित शर्मावेस्ट इंडिज