फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. आजपासून ट्वेंटी-20 मालिकेनं या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं तीन वेगवेगळे संघ जाहीर केले, तर वेस्ट इंडिजनं वन डे व ट्वेंटी-20 चा संघ जाहीर केला आहे. विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल वन डे मालिकेनंतर निवृत्ती घेणार आहे. भारताच्या वन डे आणि ट्वेंटी-20 संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
- वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, किरॉन पोलार्ड, पोव्हमॅन पॉव्हेल, कार्लोस ब्रॅथवेट ( कर्णधार), किमो पॉल, सुनील नरीन, शेल्डन कोट्रेल, ओशाने थॉमस, अँथोनी ब्रॅम्बले, जेसन मोहम्मद, खॅरी पिएरे.
- भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी
- थेट प्रक्षेपण - Sony 1/HD व 3/HD आणि SonyLIV अॅप
- वेळ - सायंकाळी 7 वाजल्यापासून
- टॉस - सायंकाळी 7.30 वाजता
ट्वेंटी-20 मालिका3 ऑगस्ट, पहिला सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून 4 ऑगस्ट, दुसरा सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून6 ऑगस्ट, तिसरा सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, रात्री 8 वा. पासून
भारत-विंडीज सामन्यात पावसाचा खोडा, काय सांगतो हवामानाचा अंदाज?विराट कोहली-रोहित शर्मा यांच्यात विश्वविक्रमासाठी शर्यत!पहिल्या ट्वेंटी-20त कशी असेल टीम इंडिया? दोन भाऊ खेळणार एकत्र?भारत-विंडीज मालिकेतून माघार; पण ग्लोबल ट्वेंटी-20त खेळण्याला प्राधान्य