किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. पण या सामन्याच्यावेळी उपस्थित झालेल्या एका प्रश्नावर अजूनही चर्चा सुरु आहे. तो प्रश्न म्हणजे, रोहितला पहिल्या कसोटी सामन्यात संधी का दिली नाही? पण या प्रश्नाचे उत्तर एका माजी क्रिकेटपटूने दिले आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला संधी मिळेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण नाणेफेकीनंतर जेव्हा कोहलीने संघातील खेळाडूंबद्दल सांगितले तेव्हा त्यामध्ये रोहितचे नाव नव्हते. यावेळी बऱ्याच जणांना धक्का बसला होता.
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला की, " पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला संधी मिळाली नाही. रोहितऐवजी अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांना प्रधान्य देत संघात स्थान दिले. या दोघांनीही पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली. त्यामुळे जेव्हा रोहितला संधी मिळेल, तेव्हा त्याला दमदार कामगिरी करावी लागेल."
रोहितला पहिल्या कसोटी सामन्यात संधी का देण्यात आली नाही. या प्रश्नावर कोहलीने उत्तर दिले. तो म्हणाला की, " संघासाठी हनुमा विहारी हा महत्वाचा खेळाडू आहे. कारण तो कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो, त्याचबरोबर तो गोलंदाजीतही संघाला हातभार लावतो. त्यामुळे रोहितऐवजी विहारीला संघात स्थान देण्यात आले."
भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. उप कर्णधार अजिंक्य रहाणेची ( 102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी ( 93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. हे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला.
भारतीय संघाने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच कसोटीत वेस्ट इंडिजला पराभूत केले. भारताने 318 धावांनी यजमान विंडीजला नमवून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेच्या दमदार फलंदाजीच्या जारोवर भारताने हा विजय मिळवला. कर्णधार विराट कोहलीनेही अनेक विक्रम नावावर केले. या सामन्यात कोहलीचे वेगळेच रूप पाहायला मिळाले.
Web Title: India vs West Indies: Why Rohit Sharma has no place in the Test team; Gautam Gambhir told
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.