पोर्ट ऑफ स्पेन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना हा वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलचा अखेरचा होता, असे म्हटले जात आहे. पण या सामन्यात तुफानी फटकेबाजी करत गेलने रोहित शर्मा आणि शाहिद आफ्रिदी यांना पिछाडीवर सोडत एक भन्नाट गोष्ट केल्याचे म्हटले जात आहे.
या सामन्यात गेलने ४१ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७२ धावांची तुफानी खेळी साकारली होती. गेलला यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने विराट कोहलीकरवी झेलबाद केले. या सामन्यात पाच षटकार लगावत गेलने एक विक्रम केल्याचे म्हटले जात आहे. आतापर्यंत या वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. गेलने या सामन्यात पाच षटकार लगावले. यासह गेलने आतापर्यंतच्या वर्षामध्ये ५६ षटकार लगावले आहेत.
आतापर्यंत एका वर्षात सर्वाधिक षटकार लगावण्याच्या यादीमध्ये मात्र गेलला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज ए बी डिव्हिलियर्सने २०१५ साली ५८ षटकार लगावले होते. पण या यादीमध्ये गेलने रोहित आणि आफ्रिदी यांना मात्र मागे टाकले आहे. कारण आफ्रिदीने २००२ साली ४८ आणि रोहितने २०१७ साली ४६ षटकार लगावले होते.
ख्रिस गेलने रचला इतिहास; सचिनलाही टाकले पिछाडीवरवेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलने भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला आहे. हा इतिहास रचताना त्याने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही पिछाडीवर टाकल्याचे दिसत आहे.
या सामन्यापूर्वीच गेलने सचिनसह श्रीलंकेचा सलामीवीर सनथ जयसूर्या यांनाही मागे टाकले होते. गेलने जेव्हापासून सलामीला यायला सुरुवात केली. तेव्हापासून गेलनेच सलामीला येताना क्रिकेट जगतामध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. एकंदरीत सर्व फलंदाजांनी आपल्या कारकिर्दीत सलामीला येऊन केलेल्या या धावा नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना सर्वाधिक धावांचा विक्रम गेलच्या नावावर आहे. त्याचबरोबर सलामीला येऊन दहा हजार धावा करण्याचा मान फक्त गेलला मिळाला आहे. आतापर्यंत सलामीला येत गेलने १०, १०७ धावा केल्या आहेत. सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम गेलच्याच नावावर दिसत आहे.
भारताविरुद्ध तुफानी फलंदाजी करत वेस्ट इंडिजने १७ वर्षांनंतर रचला विक्रमआतापर्यंत वेस्ट इंडिजकडे एकापेक्षा एक धडाकेबाज फलंदाज आपण पाहिले. पण तरीही गेल्या १७ वर्षांमधील आक्रमक फलंदाजी भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाली. गेल्या १७ वर्षांतील वेस्ट इंडिजचे सर्वात जलद शतक या सामन्यात पाहायला मिळाले. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी फक्त ९.१ षटकांमध्ये संघाचे शतक पूर्ण केले. वेस्ट इंडिजला गेल्या १७ वर्षांमध्ये ही गोष्ट करायला जमली नव्हती.
हा फोटोच सांगतोय ख्रिस गेलची तोफ थंडावणार का...भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल निवृत्त होणार, असे बरेच जण म्हणत होते. पण गेलने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण जर या सामन्यात बाद झाल्यानंतर ख्रिस गेलचा फोटो पाहिला तर त्यामधून त्याच्या निवृत्तीचे संकेत मिळत असल्याचे चाहते म्हणत आहेत.
विश्वचषकाच्यावेळी गेलने आपल्या कारकिर्दीबाबत भाष्य केले होते. पण त्यामधून गेल कधी निवृत्त होणार हे नेमके कळत नव्हते. गेल विश्वचषकाच्या वेळी म्हणाला होता की, "माझ्या कारकिर्दीचा हा काही शेवट नाही. मी कदाचित अजून एक मालिका नक्कीच खेळेन. आता विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये मालिका खेळवण्यात येणार आहे. भारताविरुद्ध मी कदाचित कसोटी मालिका खेळेन. त्यानंतर भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मी नक्कीच खेळणार आहे. पण ट्वेन्टी-२० मालिकेत मात्र मी खेळणार नाही."
गेलने हे वक्तव्य केल्यावर मात्र वेस्ट इंडिजच्या प्रसारमाध्यमांचे व्यवस्थापक फिलीप स्पुनर यांनी ही गोष्ट अधिक स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते की, " हो, भारताविरुविरुद्धच्या मालिकेनंतर ख्रिस गेल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार आहे." पण याबाबत अधिकृत घोषणा गेलने आतापर्यंत केलेली नाही. पण मैदानामध्ये गेल ज्यापद्धतीने वागला ते पाहता त्याचा हा अखेरचा सामना असावा, असे म्हटले जात आहे.
या सामन्यात गेलने ४१ चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७२ धावांची तुफानी खेळी साकारली होती. गेलला यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने विराट कोहलीकरवी झेलबाद केले. बाद झाल्यावर गेलने हेल्मेट काढले आणि आपल्या बॅटवर ठेवले. गेलची ही कृती नेमके काय दर्शवते, याचा अंदाज अजूनही काही क्रिकेट चाहत्यांना आलेला नाही. गेल बाद झाल्यावर त्याला कोहली आणि रोहित शर्मा यांनी त्याची गळाभेटही घेतली होती. या साऱ्या गोष्टी पाहता गेलचा हा अखेरचा सामना असेल, असे म्हटले जात आहे.